
पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात ३ पदकांची भर पडल्याने राष्ट्रकुल स्पर्धेत भारत सध्या सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेत ऑस्ट्रेलिया १०६ पदक जिंकून प्रथम स्थानावर असून इंग्लंड ८६ सह दुसऱ्या स्थानी आहे. आज बुधवारी राष्ट्रकुल स्पर्धेचा सहवा दिवस असून आजच्या दिवशी पदकांना कोण गवसणी घालणार हे पाहाणं औसुक्याच ठरणार आहे.
इंग्लंडच्या बर्मिगहम येथे सुरु राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताचे खेळाडू दमदार कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ दाखवत चार पदकं पटकावली आहेत. यात दोन सुवर्णपदकांसह दोन रौप्य पदकांचा समावेश असून भारताच्या वेटलिफ्टर संघाची कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे. मंगळवारी पाचव्या दिवशी खेळाडूंनी जिंकलेल्या चार पदकांमुळे भारताची पदकसंख्या १३ वर गेली आहे. आज बुधवारी राष्ट्रकुल स्पर्धेचा सहवा दिवस असून आजच्या दिवशी पदकांना कोण गवसणी घालणार हे पाहाणं औसुक्याच ठरणार आहे.
जाणून घ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सहाव्या दिवसाचे शेड्युल:
ज्युडो :
महिला ७८ किलो क्वार्टर फाइनल : तूलिका मान (दुपारी२. ३० )
पुरूष १०० किलो प्री क्वार्टर फाइनल : दीपक देसवाल (दुपारी २. ३० )
लॉन बॉल्स:
पुरुष एकेरी: मृदुल बोरगोहेन (दुपारी १ आणि ४ वाजता)
महिला दुहेरी: भारत विरुद्ध नियू (१ दुपारी आणि ४ दुपारी)
पुरुष चार: भारत विरुद्ध कुक आयलंड आणि इंग्लंड (संध्याकाळी ७. ३० आणि रात्री १०. ३०)
महिला तिहेरी: भारत विरुद्ध नियू (७. ३० संध्याकाळी )
स्क्वॉश :
पुरुष दुहेरी अंतिम ३२: भारत विरुद्ध श्रीलंका (दुपारी ३. ३०)
वेटलिफ्टिंग :
लवप्रीत सिंग पुरुष १०९ किलो : दुपारी २ वा
पौर्णिमा पांडे महिला ८७ किलो : संध्याकाळी ६. ३० वा
गुरदीप सिंग पुरुष १०९ किलो: रात्री ११ वाजल्यापासून
बॉक्सिंग :
महिला ४५ ते ४८ किलो उपांत्यपूर्व फेरी: नीतू गंघास (दुपारी ४. ४५पासून)
४८ ते ५० किलो उपांत्यपूर्व फेरी: निखत जरीन (रात्री ११ पासून)
६६ ते ७० किलो उपांत्यपूर्व फेरी: लोव्हलिना बोरगोहेन (दुपारी १२. ४५पासून)
पुरुष: ५४ ते ५७ किलो उपांत्यपूर्व फेरी: हुसामुद्दीन मोहम्मद (सायंकाळी ५. ४५पासून)
७५ ते ८० किलो उपांत्यपूर्व फेरी: आशिष कुमार (दुपारी २ वाजेपासून)
क्रिकेट
महिला टी २० भारत विरुद्ध बार्बाडोस (रात्री १०. ३०)
भारत १३ पदक जिंकून ६ व्या क्रमांकावर :
पाचव्या दिवशी भारताच्या खात्यात ३ पदकांची भर पडल्याने राष्ट्रकुल स्पर्धेत भारत सध्या सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. स्पर्धेत ऑस्ट्रेलिया १०६ पदक जिंकून प्रथम स्थानावर असून इंग्लंड ८६ सह दुसऱ्या स्थानी आहे.