priyanka goswami

ॲथलीट प्रियांका गोस्वामी (Silver Medal To Priyanka Goswami) हीने १० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे.

    बर्मिंगहॅम: कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये (Commonwealth Games 2022) भारताची ॲथलीट प्रियांका गोस्वामी हीने १० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत रौप्यपदक पटकावलं आहे. प्रियांकाने ४३.३८ मिनिटांत १०००० मीटर अर्थात १० किमी अंतर पूर्ण केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या जेमिमाने ४२.३४ मिनिट वेळेत हे अंतर पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

    प्रियांकाने पदक जिंकण्याआधी भारत राष्ट्रकुल स्पर्धेच्या क्रमवारीत २६ पदक जिंकून ५ व्या स्थानावर झेपावला होता. स्पर्धेच्या ९ व्या दिवशी आणखी कोणते खेळाडू पदकांना गवसणी घालणार हे पाहण औसुक्याचे ठरणार आहे.

    शनिवारी भारताला कुस्तीपटूंकडून ९ पदकांची अपेक्षा आहे. यात भारतीय कुस्तीपटूंना पात्रता फेरीतून आपले कौशल्य दाखवावे लागणार आहे, तर कुस्तीपटू दिनेश फोगाट देखील आज प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी सज्ज असणार आहे. तसेच पी व्ही सिंधू देखील बॅडमिंटनमध्ये आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे.