‘सिंहासनावर नव्या रॉयलचा राज’ असे म्हणत अमूलने जाहिरातीद्वारे कोहलीचे केले कौतुक

विराटने १९ सप्टेंबरला घोषित केले आहे की, तो आयपीएलच्या या हंगामानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार आहे. यानंतर अमूलने याच अनुषंगाने एक कार्टून तयार केले आहे. कार्टूनमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली खुर्चीवर बसलेला दिसत आहे. कार्टूनसोबत जे कॅप्शन लिहिले गेले आहे त्यामुळे त्याची खूप चर्चा होत आहे.

    डेअरी प्रोडक्ट्स बनवणारा ब्रँड अमूल (Amul) जगभरात व देशभर घडणाऱ्या विविध घटनांवर आपल्या जाहिरातीतून भाष्य करत असतो. त्याच्या माध्यमातून त्यांचे मत सर्वापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. अमूल त्यांचे मत जाहिरात किंवा कार्टूनमधून जगासमोर मांडत असतो. सध्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे आणि क्रिकेट चाहत्यांनी सामन्यांचा आनंद घ्यायला सुरुवात केली आहे.

    दरम्यान आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने (Virat kohali, captain of IPL franchise Royal Challengers Bangalore) घोषणा केली आहे की, हा चालू आयपीएलचा हंगाम त्याचा आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपातील शेवटचा हंगाम असणार आहे. त्याच्या या घोषणेनंतर अमूलने याच पार्श्वभूमीवर एक कार्टून बनवले आहे.

    विराटने १९ सप्टेंबरला घोषित केले आहे की, तो आयपीएलच्या या हंगामानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणार आहे. यानंतर अमूलने याच अनुषंगाने एक कार्टून तयार केले आहे. कार्टूनमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहली खुर्चीवर बसलेला दिसत आहे. कार्टूनसोबत जे कॅप्शन लिहिले गेले आहे त्यामुळे त्याची खूप चर्चा होत आहे. अमूलने विराटच्या कार्टूनसोबत लिहिले आहे की, “सिंहासनावर नव्या रॉयलचा राज? अमूल आव्हान नसलेला नेता!”