Bad days in Hardik Panda's cricket career; Difficult to return due to fitness challenge

भारतीय संघ व्यवस्थापनानेदेखील हार्दिकला झुकते माप देत त्याला सर्व सामन्यात संधी दिली. आता बीसीसीआयने ही चूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 व कसोटी मालिकेतून झालेली त्याची हकालपट्टी. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे(Bad days in Hardik Panda's cricket career; Difficult to return due to fitness challenge).

    मुंबई : भारतीय संघाचा अष्टपैलू आणि तडाखेबाज फलंदाज हार्दिक पांड्या सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट परिस्थितीचा सामना करीत आहे. अलिकडचे पार पडलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सुमार कामगिरी केल्यामुळे हार्दिकला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून डच्चू दिला गेला. संपूर्ण ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिकच्या निवडीवरून बरीच चर्चा रंगली होती.

    भारतीय संघ व्यवस्थापनानेदेखील हार्दिकला झुकते माप देत त्याला सर्व सामन्यात संधी दिली. आता बीसीसीआयने ही चूक सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचं पहिलं पाऊल म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 व कसोटी मालिकेतून झालेली त्याची हकालपट्टी. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संधी मिळण्याची शक्यता कमी आहे(Bad days in Hardik Panda’s cricket career; Difficult to return due to fitness challenge).

    आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात एकही षटक न ठोकणाऱ्या आणि फलंदाजीतही फार कमाल न करू शकलेल्या हार्दिकची निवड का केली गेली, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अष्टपैलू म्हणून त्याचे संघातील स्थान जाणवलेच नाही. आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी बीसीसीआयने हार्दिकला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाऊन फिटनेस सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहे.

    त्याचे दुखापतीतून सावरणे हे विश्रांतीवर अवलंबून आहे. त्याने लवकरच एनसीएमध्ये दाखल व्हावे आणि त्यानंतर त्याची फिटनेस पाहून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याचा विचार करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिकला बाकावर बसवून वेंकटेश अय्यरची निवड केली गेली. वेंकटेशने किवींविरुद्ध गोलंदाजी केलेली नाही. फलंदाजीतही त्याला पुरेशी संधी मिळालेली नाही. पण, पुढील ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचा विचार करून मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहीत शर्मा यांनी आतापासून संघबांधणीवर भर दिला आहे. त्यामुळे वेंकटेशला ते अधिकाधिक संधी देण्याच्या पक्षात आहेत.