कानपूर टेस्टपूर्वी टीम इंडियासमोरचे दोन प्रश्न, रोहितच्या जागी कोण करणार ओपनिंग आणि..

पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. गिलने त्याची अखेरची टेस्ट, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती. तर मयंकने खेवटची टेस्ट या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. दुखापत झाल्यामुळे गिल टीमबाहेर पडला होता, तर मयंक टीममध्ये होता खरा, पबण रोहिल-गिल आणि नंतर रोहित-राहुलच्या चांगल्या खेळीमुळे त्याला प्लेयिंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते. दोघांच्याही कामगिरीचा विचार केला तर, मयंक अग्रवालचा दावा अधिक मजबूत मानण्यात येतो आहे. त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये के एल राहुलसोबत मयंक मैदानात दिसण्याची शक्यता अधिक मानण्यात येते आहे.

  कानपूर – भारत आणि न्यूझीलंड टीममध्ये कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दोन्ही टीममधील पहिली टेस्ट मॅच रंगणार आहे. या ट्सेटपूर्वी टीम डियासमोर दोन आव्हाने आहेत, ज्यांची उत्तरे टीमला शोधावी लागणार आहे. सर्वात पहिली समस्या आहे ती म्हणजे, रोहित शर्माला या मॅचमध्ये विश्रांती दिली जाणार आहे. त्यामुळे ओपनिंगला के एल राहुलसोबत कोण मैदानात उतरणार, य़ाची क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे. टीम इंडियाच्या टेस्टचा कॅप्टन विराट कोहलीही ही मॅच खेळणार नाहीये, त्यामुळे अजिंक्य राहणेच्या नेतृत्वात टीम टेस्टसाठी मैदानावर उतरणार आहे.

  आता प्रश्न असा आहे की, द्रविड आणि रहाणे हे ओपनिंगसाठी राहुलसोबत कुणाला मैदानात पाठवणार आहेत. यापूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्टमध्ये रोहीत आणि राहुल हीच जोडी ओपनिंगला खेळली होती.

  टीमकडे दोन पर्याय

  पहिल्या मॅचमध्ये रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल यांच्या नावांचा विचार होऊ शकतो. गिलने त्याची अखेरची टेस्ट, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळली होती. तर मयंकने खेवटची टेस्ट या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. दुखापत झाल्यामुळे गिल टीमबाहेर पडला होता, तर मयंक टीममध्ये होता खरा, पबण रोहिल-गिल आणि नंतर रोहित-राहुलच्या चांगल्या खेळीमुळे त्याला प्लेयिंग ११ मध्ये स्थान मिळाले नव्हते.

  दोघांच्याही कामगिरीचा विचार केला तर, मयंक अग्रवालचा दावा अधिक मजबूत मानण्यात येतो आहे. त्यामुळे पहिल्या टेस्टमध्ये के एल राहुलसोबत मयंक मैदानात दिसण्याची शक्यता अधिक मानण्यात येते आहे.

  कोण घेणार विराट कोहलीची जागा

  कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि कोच राहुल द्रविड यांच्यासमोर आव्हान आहे की चौथ्या नंबरसाठी कोणत्या बॅट्समनची निवड करायची. या क्रमांकावर खरेतर विराट कोहली खेळतो, पण त्याच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर किंवा शुभमन गिल यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. गिल खरेतर ओपनर आहे पण गरज पडल्यास तो मिडल ऑर्डरलाही खेळू शकतो. कोहलीच्या जागी गिल हा अय्यरपेक्षा चांगला पर्याय असू शकतो.

  श्रेयस अय्यरलाही संधी आहेच, अय्यर मिडल ऑर्डरचाच बॅट्समन असून, वन डेत तो चौथ्या क्रमांकावर खेळतो. श्रेयसला संधी मिळाली तर कानपूर टेस्ट ही त्याची पहिलीच टेस्ट मॅच असेल.