क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे ‘Mullagh Medal’ ने सन्मानित, हे पदक जिंकणारा ठरला पहिलाच खेळाडू

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खडतर परिस्थितीत नेतृत्व कौशल्य दाखवत ऐतिहासिक कामगिरी केल्याने अजिंक्य राहणेमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अजिंक्यला सामन्यानंतर 'Mullagh Medal' देण्यात आलं. हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खडतर परिस्थितीत नेतृत्व कौशल्य दाखवत ऐतिहासिक कामगिरी केल्याने अजिंक्य राहणेमुळे भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. टीम इंडियानं बॉक्सिंग डे कसोटीत ८ विकेट राखून बाजी मारली आणि चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. अजिंक्यला सामन्यानंतर ‘Mullagh Medal’ देण्यात आलं. हे पदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला.

 

पदकाचे विशेष महत्व
बॉक्सिंग डे कसोटीत क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मॅन ऑफ दी मॅच विजेत्या खेळाडूला जॉनी मुलाघ मेडल देण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यातील संघाचे मुलाघ हे कर्णधार होते आणि त्यांना मानवंदना म्हणून हा निर्णय घेण्यात आला. १८६८मध्ये मुलाघ यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा दौरा केला होता. मुलाघ यांनी Indigenous संघाचे नेतृत्व सांभाळले आणि त्यांनी ४५ सामन्यांत ७१ डावांमध्ये १६९८ धावा केल्या. त्यांनी एकूण १८७७ षटकं टाकली आणि त्यापैकी ८३१ षटकं ही निर्धाव दिली. त्यांच्या नावावर २५७ विकेट्स आहेत. त्यांनी पार्ट टाईम यष्टिरक्षणही केलं आणि त्यात त्यांनी चार स्टम्पिंग केले.त्यांच्या या विशेष कामगिरी सन्मानार्थ हे पदक दिले जाते.

भारताचा विजयी डाव
अजिंक्य रहाणे व रवींद्र जडेजा यांच्या दमदार फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी Boxing Day कसोटीत ऑस्ट्रेलियाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. भारताच्या पहिल्या डावातील १३१ धावांची आघाडी भरून काढण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०० धावांवर गडगडला. मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह, आर अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर उमेश यादवनं एक बळी टिपला.

दुसऱ्या डावात जो बर्न्स ( ४), स्टीव्हन स्मिथ ( ८), कर्णधार टीम पेन ( १) ही मंडळी एकेरी धाव करून बाद झाले. मॅथ्यू वेड ( ४०) व मार्नस लाबुशेन ( २८) यांनी काही काळ संघर्ष केला, परंतु या दोघांना अनुक्रमे रवींद्र जडेजा व आर अश्विन यांनी तंबूत पाठवले. ६ बाद ९९ धावांवरून कमिन्स व ग्रीन या जोडीनं ऑस्ट्रेलियाला १५६ धावांपर्यंत नेले. या दोघांची ५७ धावांची भागीदारी चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात बुमराहनं संपुष्टात आणली. कमिन्स १०३ चेंडूंत २२ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या बाजूनं ग्रीनचा संघर्ष सुरूच होता, परंतु सिराजनं ग्रीनला ( ४५) बाद करून ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावा करता आल्यानं टीम इंडियासमोर विजयासाठी ७० धावांचे माफक लक्ष्य होते.

मयांक अग्रवाल ( ५) व चेतेश्वर पुजारा ( ३) झटपट माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व अजिंक्य रहाणेनं संगाला विजय मिळवून दिला. अजिंक्यनं विजयी धाव घेतली. गिल ३५ धावांवर, तर अजिंक्य २७ धावांवर नाबाद राहिला. पहिल्या डावातील शतकी खेळीनंतर अजिंक्यला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला.