Doubts about IPL being played in India, BCCI is preparing Plan B.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बीसीसीआय आयपीएलबाबत प्लॅन बी तयार करीत आहे. यासाठी  बीसीसीआयने दोन पर्याय शोधले आहे. यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला संधी मिळण्याची शक्यता आहे.

    मुंबई : भारतात कोरोनाचा कहर अधिकाधिक वाढताना दिसतोय. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या ही आयपीएल भारतात खेळल्या जाण्यावर शंका निर्माण करीत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बीसीसीआय आयपीएलबाबत प्लॅन बी तयार करीत आहे. यासाठी  बीसीसीआयने दोन पर्याय शोधले आहे. यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला संधी मिळण्याची शक्यता आहे. एप्रिलपर्यंत कोरोनाचा धोका असाच वाढत राहिला तर या दोन देशांचा विचार केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे गेले दोन सिझन हे दुबईत खेळवण्यात आले होते.  आयपीएल २०२१ चे काही सामने भारतात तर काही सामने दुबईत खेळवल्या गेले होते. 

    तसे तर , टी-२० चे यजमानपद भारताकडेच होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हे सामने दुबईत खेळण्यात आले. परंतु,  बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण फक्त दुबईवर अवलंबून राहू शकत नाही. आपणांस वेगवेगळे पर्याय शोधावे लागतील. या पर्यायात अव्वल स्थानावर बीसीसीआय दक्षिण आफ्रिकेचा विचार करत आहे. कारण, आता सुरु असलेल्या भारताच्या सामान्यांचे आयोजन दक्षिण आफ्रिकेने चांगल्या पद्धतीने केलेले आहे.  

    दुसऱ्या टेस्टच्या वेळी ज्या ठिकाणी भारतीय संघ थांबला होता तेथील व्यवस्थाही उत्तम होती. ती जागाही मोठी असून त्यात एक तलावही होता. त्यामुळे, बायो बबलमध्ये केवळ एका खोलीत राहण्याची मर्यादा खेळाडूंवर आली नाही. तसेच २००९ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी आयपीएल द. आफ्रिकेत खेळवण्यात आले होते. तसेच, द. अफ्रिकेची वेळ ही भारतापेक्षा ३ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. म्हणजे द. अफ्रिकेत संध्याकाळी पाच वाजले असतील तर भारतात तेव्हा रात्रीचे ८.३० वाजलेले असतात. त्यामुळे, प्रसारणाच्या वेळेतही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळेच आयपीएलसाठी  द. अफ्रिकेचा पर्याय पहिल्या क्रमांकावर आहे.