वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व संजना अडकले विवाहबंधनात!

बुमराह आणि संजनाच्या विवाह सोहळ्यात कोरोना साथीची सर्व नियमांचे पालन केले गेले. आज जसप्रीत बुमराहने स्वतः लागांचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे

    भारतीय टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज गोव्यात विवाहबद्ध झाला . त्याने स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशनशी विवाहगाठ बांधली. बुमराह आणि संजनाने त्यांचे जवळचे नातेवाईक आणि खास मित्रांच्या साथीने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. गोव्यातील एका गुरुद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडला.

    बुमराह आणि संजनाच्या विवाह सोहळ्यात कोरोना साथीची सर्व नियमांचे पालन केले गेले. आज जसप्रीत बुमराहने स्वतः लागांचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.बुमराह जेव्हा चौथ्या आणि अंतिम कसोटी तसेच इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेमधून बाहेर पडला तेव्हापासूनच यामागे त्याचे लग्न हेच कारण असावे असा अनेकांनी अंदाज बांधला होता.