आज न्यूझीलंड आणि अफगाणिस्थानमध्ये लढत, अफगाणिस्थानने न्यूझीलंडवर मात करावी ही प्रत्येक भारतीयाची इच्छा

न्यूझीलंड आणि अपगाणिस्थान या दोन्ही टीममध्य् सेमाफायनलमध्ये पोहचण्यासाठीची स्पर्धा आहे. न्यूझीलंडने मॅच जिंकली तर त्यांचा सेमीफायनलमध्ये सहज प्रवेश होणार आहे. अफगाणिस्थानला मात्र सेमी फायनलमध्ये प्रवेशासाठी मोठ्या विजयाची गरज आहे. अफगाणिस्थान टीम विजयी झाली, तर त्याचा टीम डियाला मोठा फायदा होणार आहे. जर आज अफगाणिस्थानने मॅच जिंकली, तर सोमवारी होणाऱ्या नामबियाविरुद्धच्या मॅचमध्ये किती मोठ्या फरकाने जिंकावे लागेल, हे टीम इंडियाला स्पष्ट होणार आहे.

    अबुधाबी- टी-२० वर्ल्ड कपच्या रविवारी होणाऱ्य् मॅचमध्ये अफगाणिस्थान आणि न्यूझीलंड आमने सानमे असणार आहेत. ही मॅच टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जर ही मॅच अफगाणिस्थानने जिंकली तर टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये प्रवेश नक्की मानण्यात येतो आहे. पण जर न्यूझीलंडने मॅच जिंकली, तर टीम इंडियाला भारतात रिकाम्या हाती परतावे लागणार आहे. त्यामुळे आज अफगाणिस्थानच्या पाठिशी भारतीय क्रिकेटचे फॅन्स असून, अफगाणिस्थानला जोरदार सपोर्ट देण्यात येतो आहे. सोशल मीडियावरही हेच पाहयला मिळतंय.

    दोन्ही टीमसाठी महत्त्वाची लढत