Former cricketer Mohammad Azharuddin's car crashed in Rajasthan

राजस्थान : माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या कारला भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातातून मोहम्मद अजहरुद्दीन थोडक्यात बचावले आहेत. नव वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत माधोपूर येथील रणथंबौर इथं आले होते.

राजस्थानमधील (rajasthan) सवाई माधोपूर जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. अजहरुद्दीन आपल्या कुटुंबीयांसोबत हुंदई एसयुव्ही कारने रणथंभौर भवन इथं चालले होते. फूल मोहम्मद चौकात पोहोचल्यानंतर ड्रायव्हरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कार महामार्गाच्या बाजूला असलेल्या ढाब्यात शिरली. यात ढब्यात काम करणारा एक तरुण जखमी झाला आहे.

या अपघातात धाब्याचे आणि अजहरुद्दीन यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात अझहरुद्दीन यांच्या कुटुंबीयांना कोणतीही दुखापत झाली नाही. सर्वजण सुरक्षीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.