Great shock to Team India before Kanpur Test! KL Rahul will miss both Tests due to injury; Suryakumar included in the team

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टच्या आधी दोन दिवस टीम इंडियाकडून एक वाईट बातमी आली आहे. टीमचा स्टार ओपनर के एल राहुल दुखापतीमुळे टेस्ट सीरीजमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक काढून याची माहिती दिली आहे. या पत्रकार राहुल याच्या डाव्या जांघेत दुखापत झाल्याने तो दोन्ही टेस्ट खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला टीममध्ये संधी देण्यात आली आहे(Great shock to Team India before Kanpur Test! KL Rahul will miss both Tests due to injury; Suryakumar included in the team).

    कानपूर : न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टेस्टच्या आधी दोन दिवस टीम इंडियाकडून एक वाईट बातमी आली आहे. टीमचा स्टार ओपनर के एल राहुल दुखापतीमुळे टेस्ट सीरीजमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रक काढून याची माहिती दिली आहे. या पत्रकार राहुल याच्या डाव्या जांघेत दुखापत झाल्याने तो दोन्ही टेस्ट खेळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याच्याऐवजी सूर्यकुमार यादवला टीममध्ये संधी देण्यात आली आहे(Great shock to Team India before Kanpur Test! KL Rahul will miss both Tests due to injury; Suryakumar included in the team).

    के. एल. राहुल गेल्या काही दिवसांपासून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळत होता. इंग्लंडचा दौरा, आयपेल फेज २, टी-२० वर्ल्ड कप आणि न्यूझीलंड टी २० सीरिज या सगळ्यात राहुल टीमचा मुख्य सदस्य होता. या सगळ्या मॅचमध्ये राहुलने चांगली कामगिरी केली आहे. मुंबईचा बॅट्समन सूर्यकुमार यादवला राहुलच्या ऐवजी टीममध्ये संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यापूर्वी टी-२०त टीममध्ये होता.

    न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यातच आता के एल राहुलही बारे पडल्याने याचा टीमवर मोठा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येते आहे. विराट कोहली मुंबईत होणाऱ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार आहे.