ravindra jadeja

मागच्या आठवड्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ताज्या क्रमावीरीनुसार वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू झाली होती. पहिल्या कसोटी सामन्यातील अप्रतिम प्रदर्शनानंतर जडेजा कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम अष्टपैलू बनला होता.

    नवी दिल्ली – आयसीसीने नेहमीप्रमाणे बुधवारी म्हणजेच १६ मार्च रोजी सुधारीत कसोटी क्रमावारी जाहीर केली. भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिकेत भारतीय संघ २-० अशा फरकाने जिंकला. परिणामी ताज्या कसोटी क्रमावारीत भारतीय खेळाडूंना फायदा झाला आहे. परंतु अष्टपैलू रवींद्र जडेजाला मात्र ताज्या क्रमवारीत नुकसान झाल्याचे दिसत आहे.

    मागच्या आठवड्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ताज्या क्रमावीरीनुसार वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू झाली होती. पहिल्या कसोटी सामन्यातील अप्रतिम प्रदर्शनानंतर जडेजा कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम अष्टपैलू बनला होता. पण पुढच्याच आढवड्यात त्याला जेसन होल्डरसाठी जागा मोकळी करावी लागली आहे.

    श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघान एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला होता, ज्यामध्ये जडेजाचे योगदान बहुमूल्य होते. जडेजाने पहिल्या डावात नाबाद १७५ धावा केल्या आणि संपूर्ण सामन्यात एकूण ९ विकेट्सही घेतल्या होत्या. या प्रदर्शनानंतर तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलू बनला होता. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४, तर दुसऱ्या डावात २२ धावा केल्या, तसेच फक्त एक विकेट घेऊ शकला. असे असले तरीही, भारताने दुसरा कसोटी सामना २३८ धावांनी जिंकला.