
पुणे : आज बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. सलामी जोडीने दमदार सुरुवात करीत ९० धावांची भागीदारी केली. संघाच्या ९३ धावा असताना, बांगलादेशला पहिला धक्का बसला, आज कुलदीप यादवने पहिली विकेट भारताला मिळवून दिली. लान्झीद हसन कुलदीप यादवच्या चेंडूवर पायचित होऊन तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार नजमुल हसन शांतोला रवींद्र जडेजाने तंबूचा रस्ता दाखवला. आता पुन्हा एकदा मोहम्मद सिराजने मेंहदी हसनला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
CWC2023. 12.5: Hasan Mahmud to Virat Kohli 6 runs, India 102/1 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
CWC2023. 47.2: Jasprit Bumrah to Mahmudullah 4 runs, Bangladesh 237/7 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
Wicket number 2⃣ for Mohd. Siraj ✅
Catch number 2⃣ for KL Rahul ✅Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #TeamIndia | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/VoPPC4NtXq
— BCCI (@BCCI) October 19, 2023
GONE! @imjadeja strikes as #TeamIndia scalp the second Bangladesh wicket 👍 👍
Follow the match ▶️ https://t.co/GpxgVtP2fb#CWC23 | #INDvBAN | #MeninBlue pic.twitter.com/FPCrCddn25
— BCCI (@BCCI) October 19, 2023
बांगलादेशचा प्रथम फलंदाजीचा निर्णय
विश्वचषकातील 17 व्या सामन्यात आज भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर लढत सुरू आहे. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आजचे हवामान कोरडे असून चांगले ऊन पडले आहे. असे असतानादेखील काल या भागात पाऊस पडल्याने पिच थोडी ओलीच असणार आहे. त्यामुळे पिच नक्कीच गोलंदाजांना सहकार्य करेल असे वाटते.तरीही
विजयी हॅट्ट्रीक
भारतीय संघाने मागील तीन सामन्यात धडाकेबाज विजयी हॅटट्रीक केल्याने टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. गुणतालिकेतसुद्धा भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर असल्याने टीम इंडिया सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. आजचा विजय मिळवला तर भारताचा विजयी चौकार होईल.
तीन सामन्यात केवळ एकच विजय
तर, दुसरीकडे बांगलादेशने तीन सामन्यात केवळ एकच विजय प्राप्त केल्याने बांगलादेशला गुणतालिकेत वरचे स्थान प्राप्त करण्यासाठी आज मोठा विजय मिळवणे अपेक्षित आहे. तशी बांगलादेशची भारताविरुद्धची कामगिरी आतापर्यंत बरी राहिली आहे. मागील 3 वनडेमध्ये बांगलादेशने भारताविरुद्ध विजय मिळवले असल्याने भारताला बांगलादेशबरोबर खेळताना काळजी घेणे गरजेचे आहे.
बांगलादेश संघ : लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो (सी), मेहदी हसन मिराझ, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम
भारतीय संघ : रोहित शर्मा (क), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज