रोहितने एका बाणाने केले २ लक्ष्य, या प्रकरणात धोनी-मॉर्गनला सोडले मागे

India vs Sri Lanka: भारताने दुसऱ्या टी- २० सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी राखून पराभव केला. हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने कर्णधार म्हणून अनोखा विक्रम केला आहे.

  नवी दिल्ली : रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून तो संघात नवनवीन प्रयोग करत आहे आणि त्यात यशस्वीही होत आहे. आता त्याने कर्णधारपदाखाली नवा विश्वविक्रम केला आहे. त्याने अनेक दिग्गज कर्णधारांना मागे सोडले आहे. रोहित शर्मा नेहमीच आपल्या कर्णधारपदाखाली खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो.

  श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात, भारताने सलग ११वा टी-२० विजय नोंदवला, ज्यामध्ये टी-२० विश्वचषकात भारताने तीन सामने जिंकले. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आठ सामने जिंकले. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकल्या आहेत. सुपरस्टार फलंदाज रोहित शर्मा आता तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे.

  कर्णधार म्हणून घरच्या मैदानावरील विजयाचा विक्रम (टी-२०)
  रोहित शर्मा – १६ विजय
  इऑन मॉर्गन – १५ विजय
  केन विल्यमसन – १५ विजय
  अॅरॉन फिंच – १३ विजय
  विराट कोहली – १३ विजय

  भारताचा सलग ११वा टी-२०I मालिका विजय (घरच्या मैदानावर)
  1. वि श्रीलंका २-० (एक सामना बाकी)
  2. वि. वेस्ट इंडिज ३-० (२०२२)
  3. वि न्यूझीलंड ३-० (२०२२)
  4. वि. इंग्लंड ३-२ (२०२१)
  5. वि श्रीलंका २-० (२०१९)
  6. वि. वेस्ट इंडिज २-१ (२०१९)
  7. वि बांगलादेश २-० (२०१९)