अटीतटीच्या सामन्यात भारताची इंग्लंडवर मात ; मालिकाही जिंकली

टॉस गमावून फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्मा-शिखर धवनने शतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित-धवनमध्ये १०३ धावांची भागीदारी झाली. मधल्या फळीतील रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने आक्रमक पवित्रा घेत संघाचा डाव सावरला.

    पुणे : भारतीय संघाने आज तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार विजय मिळवला.भारतीय संघाने यावेळी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. यावेळी इंग्लंडचे फलंदाज सातत्याने बाद होत गेले आणि भारताने तिसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने मालिका २-१ अशी जिंकली आहे.

     

    टॉस गमावून फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी रोहित शर्मा-शिखर धवनने शतकी भागीदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. रोहित-धवनमध्ये १०३ धावांची भागीदारी झाली. मधल्या फळीतील रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने आक्रमक पवित्रा घेत संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ९९ धवनची भागीदारी झाली. या दरम्यान, पंत आणि हार्दिकने शानदार वैयक्तिक अर्धशतक ठोकले. पंतने ६२ चेंडूत ७८ धावा ठोकल्या. त्यांनतर हार्दिकने ४४ चेंडूत ६४ धावा केल्या. यानंतर, शार्दूलने पुन्हा एकदा बॅटने कमाल केली. शार्दूलने ३० धावा केल्या ज्यात १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. कृणाल पांड्या २५ धावा करून परतला.

    भारताच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात झोकात झाली खरी, पण त्यानंतर त्यांना धक्के बसत गेले. भारताने पहिल्याच षटकात जेसन रॉयला बाद केले होते. त्याचबरोबर जॉनी बेअरस्टोलाही तिसऱ्या षटकात भुवनेश्वरनेच बाद केले आणि इंग्लंडची २ बाद २८ अशी अवस्था केली होती. त्यावेळी भारतीय संघाकडे तिसरा बळी मिळवण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी गोलंदाजीही यापूर्वी दोन विकेट्स मिळवणारा भुवनेश्वर कुमारच करत होता. पण हार्दिकमुळे भारताला ही संधी पटकावता आली नाही. पण त्यानंतर टी. नटराजनने स्टोक्सला ३५ धावांवर बाद केले.डेव्हिड मलानने यावेळी ५० धावांची दमदार खेळी साकारली खरी, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारताचा युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्यानंतर मलानसह कर्णधार जोस बटलर आणि लायम लिव्हिंगस्टोन यांना बाद केले आणि इंग्लंडचे कंबरडे मोडले. शार्दुलने तीन विकेट्स मिळवल्यावर इंग्लंडचा संघ यावेळी बॅकफूटवर ढकलला गेला. त्यानंतर मोइन अली आणि सॅम करन यांनी काही काळ फलंदाजी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.