भारत-न्यूझीलंड टेस्ट : पदार्पणाच्या मॅचमध्येच श्रेयस अय्यरची सेंच्युरी, अशी कामगिरी करणारा १६ वा बॅट्समन

आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये श्रेयस अय्यरने सेंच्युरी (Shreyas Iyer Century) केली आहे. १५७ बॉल्समध्ये त्याने सेंच्युरी पूर्ण केली. पदार्पणाच्याच मॅचमध्ये सेंच्युरी करणारा श्रेयस हा भारतीय क्रिकेटर्समध्ये १६ वा, तर जगात ११२ वा प्लेअर ठरला आहे.

  कानपूर : भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील दुसऱ्या दिवसाच्या खेळाची आज सुरुवात झाली. २५८-४ या धावसंख्येवरुन टीम इंडियाने (Team India) आजचा खेळ सुरु केला. आत्तापर्यंत टीम इंडियाचा स्कोअर (Score) पाच विकेट्स गमावून २८२ रन्स इतका झाला आहे. सध्या श्रेयस अय्यर आणि ऋद्धीमान साहा हे क्रिझवर आहेत.

  श्रेयसची सेंच्युरी

  आपल्या पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये श्रेयस अय्यरने सेंच्युरी (Shreyas Iyer Century) केली आहे. १५७ बॉल्समध्ये त्याने सेंच्युरी पूर्ण केली. पदार्पणाच्याच मॅचमध्ये सेंच्युरी करणारा श्रेयस हा भारतीय क्रिकेटर्समध्ये १६ वा, तर जगात ११२ वा प्लेअर ठरला आहे. कोणत्याही भारतीय बॅट्समनने पदार्पणाच्या मॅचमध्ये सेंच्युरी करणारा तो तिसरा क्रिकेटर ठरला आहे.

  दुसऱ्या दिवशीच्या खेळात सकाळी रवींद्र जडेजाला जीवनदान मिळाले, मात्र तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. पुढच्याच ओव्हरमध्ये साऊदीच्या बॉलवर जडेजा बोल्ड झाला. त्याने ११२ बॉल्समध्ये ५० रन्स केले. पहिल्या दिवशीही कॅप्टन अजिंक्य राहणेला जीवदान मिळाल्यानंतर, तोही बोल्ड झाला होता. पाचव्या विकेटसाठी अय्यर आणि जडेजा यांनी २२६ बॉल्समध्ये १२१ रन्सची पार्टनरशीप केली.

  टीम इंडियाची नगर ४०० रन्सवर

  दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर स्कोओर बोर्ड ४०० वर जायला हवा, अशी भारतीय टीमची इच्छा आहे. जर भारताने एवढा मोठा स्कोर उभा केला, तर न्यूझीलंडवर हा मानसिक विजय असेल. २०१३ पासून आत्तापर्यंत ज्याही मॅचेसमध्ये भारताने २५० हून जास्त स्कोअर केला आहे, अशा मॅचेसमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  पाचव्या विकेटनंतर न्यूझीलंड टीम जरा सावरली असली, तरी या मॅचमध्ये कम बॅक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.