India vs New Zealand, 2nd Test: Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, Ishant Sharma ruled out with injuries The second Test is in the midst of controversy

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सामना सुरू होण्याअगोदर टीम इंडियाचे तीन महत्वाचे खेळाडू एकाच वेळी जखमी झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा हे दुखापतग्रस्त असल्याची माहिती सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच समोर आली. त्यामुळे ऐनवेळी टीम इंडियात बदल करण्यात आले(India vs New Zealand, 2nd Test: Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, Ishant Sharma ruled out with injuries The second Test is in the midst of controversy). रहाणे, ईशांत आणि जडेजाच्या जागी विराट कोहली, जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे.

    मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सामना सुरू होण्याअगोदर टीम इंडियाचे तीन महत्वाचे खेळाडू एकाच वेळी जखमी झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा हे दुखापतग्रस्त असल्याची माहिती सामना सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच समोर आली. त्यामुळे ऐनवेळी टीम इंडियात बदल करण्यात आले(India vs New Zealand, 2nd Test: Ajinkya Rahane, Ravindra Jadeja, Ishant Sharma ruled out with injuries The second Test is in the midst of controversy). रहाणे, ईशांत आणि जडेजाच्या जागी विराट कोहली, जयंत यादव आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे.

    विराट कोहली संघात येण्यामुळे संघात एक बदल होणार होता, पण एकाचवेळी तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या दुखापतीबाबत कोणतेही अपडेट समोर आले नव्हते. तसेच हे सर्व खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त होते. बीसीसीआयकडून असे सांगण्यात आले की, रहाणे हॅमस्ट्रिंगमुळे, तर ईशांत शर्माच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच रवींद्र जडेजाचा उजवा हात दुखत आहे.

    रहाणेच्या हॅमस्ट्रिंगमध्ये ताण

    कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी रहाणेला दुखापत झाली होती. तसेच कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी ईशांतच्या बोटावर जोरात चेंडू लागला होता, पण कानपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण वेळ रहाणेने कर्णधारपद सांभाळले होते. तो दिवसभर स्लिपमध्ये उभा असल्याचे दिसत होते. हॅमस्ट्रिंगमध्ये ताण आल्याबद्दल त्याने कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच सामना संपल्यानंतरही अशी कोणती माहिती समोर आली नाही, ज्यात दुखापत झाल्याचे सांगितली गेले. गंमत म्हणजे २ डिसेंबरला बीसीसीआयने रहाणे फलंदाजीचा सराव करत असल्याचे फोटो शेअर केले होते.

    दुखापतीनंतरही ईशांतची गोलंदाजी

    कानपूर कसोटीत ईशांतला दुखापत झाली, पण त्यानंतर त्याने दिवसभर क्षेत्ररक्षण केले. गोलंदाजीही केली. दुखापत झाली असती, तर दिवसभर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचा धोका का पत्करला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ईशांतप्रमाणेच पहिल्या कसोटीदरम्यान रवींद्र जडेजालाही दुखापती झाल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष गोष्ट म्हणजे जडेजा दोन्ही डावात मैदानात भरपूर वेळ फलंदाजी करत होता. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने संघाला विजयाच्या जवळ नेले. मग दुखापत कधी झाली? नाणेफेकीवेळी कर्णधार कोहलीने जडेजाचा हात खूप दुखत असून तो बॅटही उचलू शकत नाही, असे सांगितले होते.