आयपीएल 2022 भारतातच! डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन; चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही?

क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलचा 15 वा हंगाम भारतातच खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (बीसीसीआय) जय शाह यांनी याबाबतची घोषणा केली. आयपीएल 2022 मध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे(IPL 2022 in India only! Mega auction in December).

  मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलचा 15 वा हंगाम भारतातच खेळवला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव (बीसीसीआय) जय शाह यांनी याबाबतची घोषणा केली. आयपीएल 2022 मध्ये दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे(IPL 2022 in India only! Mega auction in December).

  या ऑक्शननंतर सर्व संघांची नव्याने रचना होणार आहे. दोन संघ जास्त असल्याने अनेक नवे खेळाडू देखील पुढील आयपीएलमध्ये खेळतील. बीसीसीआयच्या या घोषणेमुळे भारतीय क्रिकेट रसिकांना दिलासा मिळाला आहे.

  चुरशीचा हंगाम

  जय शाह चेन्नईतील ‘चॅम्पिंयन्स कॉल’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आयपीएलचा पुढील हंगाम भारतामध्येच होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केले. चेन्नई सुपर किंग्स संघाने चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार (सीएसके) महेंद्रसिंह धोनी देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. मला माहिती आहे की, तुम्ही सर्वजण सीएसकेला चेपॉकच्या मैदानात खेळताना पाहण्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहात. आता हा क्षण फार दूर नाही. आयपीएल स्पर्धेचा 15 वा हंगाम भारतामध्येच खेळवला जाणार आहे. दोन नव्या टीमच्या सहभागामुळे आगामी सिझन अधिक चुरशीचा होईल, असे शाह यांनी स्पष्ट केले.

  डिसेंबरमध्ये मेगा ऑक्शन

  आयपीएलच्या मागील हंगामची सुरुवात भारतामध्ये झाली होती. मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या उद्रेकामुळे आयपीएलचा उत्तरार्ध यूएईमध्ये खेळविण्यात आला. या स्पर्धेचा अंतिम सामनादेखील यूएईमध्येच झाला. आयपीएल स्पर्धेचा मेगा ऑक्शन डिसेंबरमध्ये होणार आहे. तो आणखी खास होईल, अशी अपेक्षाही शाह यांनी यावेळी व्यक्त केली.

  दोन नव्या संघांचा समावे

  आयपीएलच्या आगामी हंगामात दोन नवे संघ सामील झाल्याने स्पर्धेतील संघांची संख्या 10 झाली आहे. दोन नव्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. आयपीएल 2022 मध्ये अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवे संघ असतील. या दोन संघासाठी नुकतेच ऑक्शन करण्यात आले होते. त्यामध्ये या दोन टीम ऑक्शन जिंकून आयपीएलशी जोडल्या गेल्या आहेत. सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबादसाठी 5,625 कोटींची बोली जिंकली आहे. तर आरपी-संजीव गोयंका समुहाने 7,090 कोटी रुपयांना लखनऊची फ्रँचायझी खरेदी केली आहे. या दोन्ही शहरांच्या टीम पुढील आयपीएलमध्ये खेळणार आहेत.

  शेवटचा सामना चेन्नईत खेळणार : धोनी

  2022 च्या आयपीएल हंगामात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी खेळणार की नाही, अशी चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. यावर स्वत: धोनीनेच उत्तर दिले. आयपीएल 2022 सुरू व्हायला आणि त्याबाबच विचार करायला बराच वेळ आहे. ही स्पर्धा एप्रिलमध्ये खेळविली जाणार आहे. सध्या नोव्हेंबर सुरू आहे. मला त्यावर विचार करावा लागेल. मला घाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही. मी कोणत्या भूमिकेत असेल, याने काहीही फरक पडत नाही. पुढील 10 वर्षे फ्रँचायझीसोबत असेल, अशी कोर टीम तयार करणे महत्त्वाचे आहे. संघ कोणत्याही कारणाने अडचणीत येऊ नये, त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ नये, असेही धोनी म्हणाला. माझा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत होईल. मग ते पुढच्या वर्षी असो वा पाच वर्षांनंतर, असेही धोनी म्हणाला.