Overnight Luck changed due to IPL Navdeep Saini, who played cricket for only Rs 200 became the owner of crores

भारताच्या देशांतर्गत सामन्यात आयपीएलचे 2008 मध्ये आगमन झाल्यानंतर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. प्रसिद्धीच्या झोतातून दूर आणि सामान्य जीवण जगणाऱ्या खेळाडूंच्या जीवनात बदल करण्याचे काम आयपीएलने केले आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात(Overnight Luck changed due to IPL! Navdeep Saini, who played cricket for only Rs 200 became the owner of crores).

    मुंबई : भारताच्या देशांतर्गत सामन्यात आयपीएलचे 2008 मध्ये आगमन झाल्यानंतर खेळाडूंची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. प्रसिद्धीच्या झोतातून दूर आणि सामान्य जीवण जगणाऱ्या खेळाडूंच्या जीवनात बदल करण्याचे काम आयपीएलने केले आहे. आयपीएलमध्ये खेळाडूंना भारतीय अनकॅप्ड खेळाडूंना आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतात(Overnight Luck changed due to IPL! Navdeep Saini, who played cricket for only Rs 200 became the owner of crores).

    आयपीएलमध्ये येण्यापूर्वी जो खेळाडू 200 रुपयांसाठी सामना खेळत होता. तो आता करोडो रुपयांचा मालक आहे. नवदीप सैनी हा राजस्थान रॉयल्सच्या संघात आहे. गोलंदाज नवदीप वेगवान आणि घातक गोलंदाज मानला जातो. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सच्या फ्रेंचायझीने त्याला खरेदी केले आहे. एकूण 2.6 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. लागोपाठ 140-150 किलोमीटरच्या वेगाने गोलंदाजी करणे हे त्याचे वैशिष्ट्ये आहे.

    भारतातील देशांतर्गत क्रिकेट सामन्यात दिल्लीच्या संघासाठी खेळणारा सैनी हरियाणाच्या करनालचा आहे. एकेकाळी नवदीप देशांतर्गत सामन्यात खेळण्यासाठी 200 रुपये प्रति सामना घेत होता. ही मालिका लेदरच्या जागी टेनिस बॉलसह खेळण्यात येत होती.

    गौतम गंभीरने केली होती मदत

    नवदीप सैनीच्या क्रिकेट विश्वातील कारकीर्दीचे श्रेय भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरला जाते. करनाल प्रीमियर लीगदरम्यान माजी गोलंदाज सुनील नरवालने नवदीप सैनीला गोलंदाजी करताना पाहिले होते. यानंतर त्याने गौतम गंभीरला सैनीबाबत सांगितले होते. नंतर त्याला सराव करण्यासाठी बोलवण्यात आले. सरावादरम्यान आपल्या गोलंगाजीच्या वेगाने गंभीरला प्रभावित केले. यानंतर गौतम गंभीरने त्याला रोज सराव करण्यासाठी बोलवले. नवदीप सैनी भारतीय संघासाठी देखील खेळला आहे. भारतासाठी 2 कसोटी, 8 एकदिवसीय आणि 11 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे.