कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्लीवर 7 विकेट राखून दणदणीत विजय

    IPL 2024 KKR vs DC LIVE : कोलकाताच्या ईडन गार्डनवर सुरु असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांची फलंदाजी एकदम खराब झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांची सुरुवातच खराब झाली. त्यांची सलामी जोडी प्रभाव पाडू शकली नाही. त्यांचा रनमशिन जेक फ्रेझर मॅकगर्क आज फेल ठरला. मॅकगर्क 12 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर ऋषभ पंत सोडला तर वरच्या फळीतील एकही फलंदाज 20 च्या पुढे धावा करू शकला नाही. आज कुलदीप यादवने दिल्लीची लाज राखली आणि धावसंख्या 20 ओव्हरमध्ये 153 धावांवर नेली.

    कोलकाता 154 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली. त्यांची सुरुवात चांगली झाली, परंतु आज सलामीवीर सुनील नारायण विशेष धावा करू शकला नाही. आज फिल्प सॉल्टने दमदार खेळी करीत 68 धावा काढल्या. त्यामुळे दिल्ली 12 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 126 धावा केल्या आहेत,