Doubts about IPL being played in India, BCCI is preparing Plan B.

इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलचा नवा मोसम सुरू होण्यास अगदी काहीच महिने बाकी आहेत. पण, जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जगभरात त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बीसीसीआय प्लॅन बी वर काम करत आहे(IPL to be played in Africa? BCCI's 'Plan B' ready).

  मुंबई : इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएलचा नवा मोसम सुरू होण्यास अगदी काहीच महिने बाकी आहेत. पण, जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. जगभरात त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलसाठी वेगवेगळ्या योजना आखत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी बीसीसीआय प्लॅन बी वर काम करत आहे(IPL to be played in Africa? BCCI’s ‘Plan B’ ready).

  एप्रिलपर्यंत भारतातील कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही तर बीसीसीआय पुन्हा एकदा परदेशात या स्पर्धेचे आयोजन करू शकते. पण तो परदेशी देश युएई नसेल. यावेळी बीसीसीआयच्या प्लॅन बीमध्ये ज्या दोन देशांची नावे पुढे येत आहेत, त्यापैकी एक दक्षिण आफ्रिका आणि दुसरा श्रीलंका आहे.
  बॉक्स

  युएईशिवाय पर्याय शोधावे लागतील

  भारतातील कोरोनाच्या बिघडलेल्या स्थितीत गेल्या 2 वर्षांपासून बीसीसीआयच्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांसाठी युएई ही पहिली पसंती आहे. तिथे आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा खेळवण्यात आला. त्यानंतर 2021 चा टी-20 विश्वचषकही तिथेच आयोजित करण्यात आला होता. पण, आता बीसीसीआयने युएई व्यतिरिक्त ठिकाणाच्या इतर काही पर्यायांवर विचार सुरू केला आहे.

  बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एकट्या यूएईवर नेहमीच अवलंबून राहू शकत नाही. इतर पर्याय शोधावे लागतील. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वेळेतील फरक खेळाडू आणि क्रिकेट चाहत्यांनाही खूप अनुकूल असेल. भारत दक्षिण आफ्रिकेच्या वेळेपेक्षा 3 तास 30 मिनिटे पुढे आहे. म्हणजे पहिला चेंडू दक्षिण आफ्रिकेत संध्याकाळी 4 वाजता टाकला जाईल, तेव्हा भारतात संध्याकाळचे 7:30 वाजले असतील. त्यामुळे प्रक्षेपणाच्या वेळेवर परिणाम होणार नाही आणि तिथे सामनाही योग्य वेळेत संपेल, त्यामुळे खेळाडूंनाही विश्रांती मिळेल.

  हे सुद्धा वाचा
  • 2022