राहुलला उपकर्णधार पदावरून हाटवू इच्छित होता कोहली; जाणून घ्या कारण

यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या बातम्या समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, विराट आणि रोहित एकमेकांशी बोलत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या.

  विराट कोहलीने काल (गुरुवारी) टीम इंडियाच्या टी -२० वर्ल्ड कपची कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर कोहलीहे कर्णधारपद सोडेल. तर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार म्हणून कायम राहील. कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या आपल्या निर्णयाची माहिती दिली आणि सर्वांना आश्चर्यचकित केले. Cराटचे कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.
  वृत्तसंस्था पीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली रोहित शर्माला उपकर्णधारपदावरून हटवू इच्छित होता. रोहितला उपकर्णधारपदारावरून काढून टाकण्याचा प्रस्ताव घेऊन विराट निवड समितीकडे गेला होता. के एल राहुलला वनडेमध्ये उपकर्णधार आणि टी -20 मध्ये वृषभ पंतला कर्णधार केले पाहिजे. असा प्रस्ताव कोहलीचने ठेवला होता. मात्र त्याचा हा प्रस्ताव निवड समितीला आवडलेला नाही पसंत केला नाही.

  यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या बातम्या समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, विराट आणि रोहित एकमेकांशी बोलत नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या सर्व गोष्टींना नकार दिला.

  कोहलीचा युवा खेळाडूंवर विश्वास नाही
  भारतीय कर्णधाराला संघातील सर्व खेळाडूंचा पाठिंबा नसल्याचेही अहवालात म्हटले आहे. विशेषत: विराट संघातील कनिष्ठ खेळाडूंना मध्येच सोडतो. पीटीआयशी बोलताना माजी क्रिकेटपटू म्हणाला –

  विराटची समस्या संवाद आहे. महेंद्रसिंग धोनीची खोली २४ तास उघडी होती आणि कोणताही खेळाडू आत येऊ शकतो. त्याच्यासोबत व्हिडिओ गेम खेळू शकतो, जेवण करू शकता होता तसेच रज पडल्यास क्रिकेटबद्दल बोलू शकतो,


  विराट कोहलीने कर्णधारपद सोडले तर रोहित शर्माला टी -२० संघाचा कर्णधार बनवण्याची सर्व शक्यता आहे आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी वृषभ पंत आणि केएल राहुलला दिली जाऊ शकते. यासोबतच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या पदाच्या शर्यतीत पुढे असेल.