कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्याची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज , इथे पाहा सामना

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना गुरुवारी, २३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळाला जाणार आहे.

    आयपीएलच्या (IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून, आज कोलकात्याविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयाची चव चाखण्यासाठी मुंबई इंडियन्स आतुर झालेला आहे. बुधवारी दिल्लीने हैदराबादवर विजय मिळवून गुणतालिकेत प्रथमक क्रमांकावर झेप घेतलीय. त्यामुळे मुंबईला जर टॉप ४ मध्ये टिकून राहायचे असेल तर आज होणाऱ्या सामन्यात कोलकात्याला आस्मान दाखवावेच लागेल.

    इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि अष्टपैलू आंद्रे रसेलने आरसीबीविरुद्ध चमकदार गोलंदाजी केली आणि शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरच्या चमकदार खेळीमुळे १० ओव्हर बाकी असताना लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला. केकेआरने या सामन्यात त्यांची आक्रमक मनोवृत्ती दाखवली आणि त्याच आक्रमतकेने मुंबईविरुद्ध ते पुन्हा एकदा मैदानात उतरतील.

    कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना गुरुवारी, २३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. हा सामना अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर खेळाला जाणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल. टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल. सामन्याचं स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होईल. हॉटस्टारवर लाईव्ह स्ट्रिमिंग असेल.

    कोलकाता नाइट राइडर्स: ऑयन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, गुरकीरत सिंह मान, करुण नायर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, हरभजन सिंह, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पवन नेगी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम दुबे, टीम साउदी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, बेन कटिंग, शाकिब अल हसन, सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, शेल्डन जॅक्सन, टीम सिफर्ट.

    मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्मधार) क्विंटन डिकॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, क्रिस लिन, सौरभ तिवारी, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, हार्दिक पंड्या, क्रुणाल पंड्या, जेम्स नीशम, जयंत यादव, किरन पोलार्ड , मार्को जॅनसेन, युद्धवीर सिंह, अॅडम मिल्ने, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, नॅथन कूल्टर-नाइल, पीयूष चावला, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट