
टीम इंडिचा कर्णधार विराट कोहली(Virat kohali) मुंबईतील कसोटी(India vs New Zealand Mumbai Test Match) सामन्याच्या पहिल्या डावात चौथ्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाला. त्याला न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने सामन्याच्या 30 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद केले. पटेलने विराटला खेळपट्टीच्या समोरच फसवून माघारी पाठवले. मात्र पंचाच्या निर्णयानंतर विराटला बाद देण्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
मुंबई : टीम इंडिचा कर्णधार विराट कोहली(Virat kohali) मुंबईतील कसोटी(India vs New Zealand Mumbai Test Match) सामन्याच्या पहिल्या डावात चौथ्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाला. त्याला न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने सामन्याच्या 30 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बाद केले. पटेलने विराटला खेळपट्टीच्या समोरच फसवून माघारी पाठवले. मात्र पंचाच्या निर्णयानंतर विराटला बाद देण्यावरून मोठा वाद सुरू झाला आहे.
दरम्यान, कित्येक खेळाडू आणि चाहत्यांनी विराट कोहलीला बाद देण्याच्या निर्णयावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. खेळपट्टीच्या समोरच विराटला एलबीडब्ल्यू म्हणून बाद घोषित करण्यात आले. मात्र अल्ट्राएजमध्ये पॅड आणि बॅट चेंडूवर एकसाथ चिकटताना दिसत होते. त्यामुळे कोहलीला बाद दिल्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
माजी क्रिकेटर वसीम जाफर आणि पार्थिव पटेल यांनी पंचाच्या या निर्णयाला चुकीचे म्हंटले आहे. वसीम जाफर यांनी म्हटले, काही स्पष्ट पुरावे नसतील तेव्हा पंचानी कधी-कधी साध्या गोष्टीचा तरी वापर केला पाहिजे. तर माजी क्रिकेटर पार्थिव पटेलने देखील कोहलीला बाद देण्याच्या निर्णयावरून प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, विराट बाद नव्हता, न्यूझीलंडला नक्कीच या निर्णयावरून फायदा झाला आहे. दुसऱ्या कॅमेरातून विराटच्या पॅडला बॉल लागलेला दिसत आहे. त्यामुळे टीव्ही अंपायरला कोणता ठोस निर्णय देता आला नाही.