पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा बीसीसीआयला दणका

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेंटी - २० वर्ल्डकप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. तसेच बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियामध्ये होणारा ट्वेंटी – २० वर्ल्डकप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे. तसेच बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्याच्या तयारीत आहे. मात्र दुसरीकडे आशिया चषकाचं यजमानपद मिळालेल्या पाकिस्तानने यंदाची स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार असं सांगितलं जात आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी पीसीबीला विनंती केली होती. परंतु ही विनंती त्यांनी अमान्य केली आहे. त्यामुळे आयपीएलवर मोठे संकट आल्याची दृश्ये दिसत आहेत. 

भारतीय संघाला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीत आशिया चषक खेळणं जमणार नाही. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्डाने पीएसएलचं आयोजन पुढे ढकलून त्या जागेवर आशिया चषक खेळवला तर योग्य होईल. नाहीतर कोरोनाच्या विषाणूच्या संकटात आशिया चषकाचं आयोजन करणं आणि सामने खेळणं शक्य नाही, असं पाक क्रिकेट बोर्डाच्या सीईओ सांगितलं होतं.

परंतु पीसीबीने पाकिस्तान सुपर लीग खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी आशिया चषक होणारच असे बुधवारी जाहीर केले.दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे पाक क्रिकेट बोर्डाने पीएसएल स्पर्धेचा अंतिम सामना स्थगित केला होता. त्यामुळे हे सामने नोव्हेंबर महिन्यात खेळवण्याच्या विचारात आहे.