रोहितला दंड होण्यापूर्वी त्याची टीम मुंबई इंडियन्सही पहिल्याच मॅचमध्ये पराभूत झाली. ईशान किशन ८१ रन्सची इनिंग खेळला, टीमचा स्कोअर १७७ पर्यंत पोहचला. त्यानंतर बॅटिंगला आलेल्या दिल्लीच्या अक्षर पटेल आणि ललित यादव यांच्यामुळे हे आव्हान त्यांनी सहज पार केले.
मुंबई : मुंबई इंडियन्स टीमला आयपीएलच्या या सीझनमधील पहिल्याच मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून ४ विकेट्सने पराभूत व्हावे लागले. ही मॅच कॅप्टन रोहित शर्मासाठी दुहेरी नुकसान करणारी ठरली आहे. एकतर पहिलीच मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे, तर दुसरे म्हणजे मॅचनंतर रोहित शर्माला १२ लाखांचा दंडही करण्यात आला आहे. दिल्लीच्या विरोओधात बॉलिंग करताना स्लो ओव्हर रेटमुळे हा दंड करण्यात आला आहे. आयपीएल मॅनेजमेंटने हा दंड केला आहे. ओव्हरच्या गतीबाबत टीमची ही पहिलीच चूक असल्याने १२ लाखांचा दंड आकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
स्लो ओव्हर रेट म्हणजे काय
ओव्हर रेट म्हणजे बॉलिंग करणाऱ्या टीमकडून एका तासात फेकण्यात आलेल्या ओव्हर्सची संख्या असते. आयसीसीच्या नियमांनुसार वन डे आणि टी -२० मध्ये एका तासात १४.१ ओव्हर्स, तर टेस्टमध्ये एका तासात १४.२ ओव्हर टाकण्याचे बंधन आहे. एकदिवसीय मॅचमध्ये ५० ओव्हर्स टाकण्यासाठी प्रत्येक टीमला ३.५ तासांचा कालावधी दिलेला असतो. तर टी-२० मॅचमध्ये टीमला एक तास २५ मिनिटांत बॉलिंग संपवायची असते.
पहिल्याच मॅचमध्ये मुंबई पराभूत