दक्षिण आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरिज जिंकण्याची टीम इंडियाची संधी हुकली, केपटाऊनमधल्या निर्णायक कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय

पहिली सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यामुळे मालिका विजयाची आशा निर्माण झाली होती. जोहान्सबर्गनंतर केपटाऊनमध्येही भारतीय बॉलर्सना अखेरच्या इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्तचा स्कोअर असूनही दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला रोखता आलं नाही. टेम्बा बऊमा 32 रनवर नाबाद तर रस्सी व्हॅन डर डुसेन 41 रनवर नाबाद राहिले. आफ्रिकेकडून पीटरसनने सर्वाधिक 82 रन केले.

    जोहान्सबर्ग पाठोपाठ आज केपटाऊनमध्येही भारताचा पराभव सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तिसऱ्या आणि निर्णयाक कसोटी सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे. या पराभवासह भारताचं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगल आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचं आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं सात विकेट्स राखून पूर्ण केलं. भारतानं कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले.

    भारतीय संघाने या संपूर्ण मालिकेत चांगली लढत दिली. पण काही त्रुटी राहिल्या, ज्यामुळे विजयाचे स्वप्न साकार होऊ शकले नाही. भारताला दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकदाही मालिका विजयाचं स्वप्न साकार करता आलेलं नाही. पहिली सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यामुळे मालिका विजयाची आशा निर्माण झाली होती. जोहान्सबर्गनंतर केपटाऊनमध्येही भारतीय बॉलर्सना अखेरच्या इनिंगमध्ये 200 पेक्षा जास्तचा स्कोअर असूनही दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला रोखता आलं नाही.  तिसऱ्या टेस्टमध्ये भारताने दिलेल्या 212 रनच्या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने अगदी सहज केला आहे. टेम्बा बऊमा 32 रनवर नाबाद तर रस्सी व्हॅन डर डुसेन 41 रनवर नाबाद राहिले. आफ्रिकेकडून पीटरसनने सर्वाधिक 82 रन केले.