टीम इंडियाला विजयासाठी ३०० पेक्षा जास्त रन्सच्या आघाडीची गरज, पुजारा-कोहलीची पार्टनरशीप महत्त्वाची

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगली बॅटिंग केली, त्यांची पार्टनरशीप चांगली झाली तर ही टेस्ट सहज टीम इंडियाच्या पाराड्यात पडू शकणार आहे. दोघांनीही पहिल्या डावात चांगली बॅटिंग केली आहे. विराटकडून मोठ्या इनिंगची आणि सेंच्युरीचीही चाहत्यांची अपेक्षा आहे. द. अफ्रिकेची बॅटिंग ऑर्डर भक्कम असल्याने, ३०० पेक्षा जास्त बढत मिळाली तरच त्यांच्यावर दबाव निर्माण होऊ शकणार आहे.

    केपटाऊन – केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने चांगले कमबॅक केले, द. अफ्रिकेचा पहिला डाव केवळ २१० रन्सवर आटोपला आहे, आणि टीम डियाला १३ रन्सची आघाडी मिळाली आहे. त्यानंतर खेळताना टीम इंडियाच्या दोन विकेट्स गेल्या असल्या, तरी आता ही आघाडी ७० रन्सची आहे. ही मॅच जिंकायची असेल तर किमान ३०० रन्सची आघाडी गरजेची असल्याचे तज्ज्ञ सांगतायेत.

    पुजारा आणि विराटच्या बॅटिंगकडे डोळे

    विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी चांगली बॅटिंग केली, त्यांची पार्टनरशीप चांगली झाली तर ही टेस्ट सहज टीम इंडियाच्या पाराड्यात पडू शकणार आहे. दोघांनीही पहिल्या डावात चांगली बॅटिंग केली आहे. विराटकडून मोठ्या इनिंगची आणि सेंच्युरीचीही चाहत्यांची अपेक्षा आहे. द. अफ्रिकेची बॅटिंग ऑर्डर भक्कम असल्याने, ३०० पेक्षा जास्त बढत मिळाली तरच त्यांच्यावर दबाव निर्माण होऊ शकणार आहे.

    बुमराहच्या बॉलिंगची चर्चा

    जसप्रित बुमराह याने बुधवारी केलेल्या कामगिरीने सर्व क्रिकेटप्रेमींना खूश केले आहे. अनेकजण सध्या त्याच्या कामगिरीचे कौतुक करीत आहेत. या टेस्टमध्ये टीम इंडियाला परत आणण्याचे काम बुमराहने पाच विकेट्स घेत केले आहे.