टीम इंडियाचा खेळ खल्लास! न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा पराभव झाल्याने विराट कोहलीचे स्वप्न अखेर भंगले

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला जबर धक्का बसला आहे. न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा पराभव झाल्याने टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला आहे(Team India out of T20 World Cup). टीम सेमीफायनलमधून बाद झाल्याने कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे.

    अबुधाबी: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला जबर धक्का बसला आहे. न्यूझीलंडकडून अफगाणिस्तानचा पराभव झाल्याने टीम इंडियाचा खेळ खल्लास झाला आहे(Team India out of T20 World Cup). टीम सेमीफायनलमधून बाद झाल्याने कर्णधार विराट कोहलीचे टी-२० वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे.

    अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभी करुन अव्वल फिरकीपटू राशिद, मुजीब, नबीच्या जोरावर न्यूझीलंडला लवकर सर्वबाद करण्याचा त्यांचा विचार होता. पण अफगाणिस्तानचे फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी झाले. केवळ नजीबउल्लाहने 73 धावा केल्यामुळे संघ किमान 124 धावा करु शकला.

    125 धावांचं टार्गेट न्यूझीलंडने अगदी सहज पार केले. 18.1 ओव्हरमध्ये केवळ 2 गडी गमावत पूर्ण केलं. यावेळी सलामीवीर गप्टील आणि मिचेल लवकर बाद झाले. पण कर्णधार केन विल्यमसनने नाबाद 40 आणि डेवोन कॉन्वेने नाबाद 36 धावाची खेळी करत न्यूझीलंडला 18.1 ओव्हरमध्ये विजय मिळवून दिला.

    न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा ८ विकेटनी पराभव केला आणि भारताचे आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील आव्हान संपुष्टात आले. आता भारताची उद्याची नामिबियाविरुद्धची लढत फक्त औपचारिकता असेल.