Team India trying to give a clean sweep to New Zealand; Rohit will show Dhoni-Kohli what they didn't get?

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची आणि तिसरी टी-२० मॅच(T20 Match: India vs New Zealand ) आज कोलकात्यात होणार आहे. जर रोहीतच्या टीमने ही कामगिरी केली, तर न्यझीलंड संघाला भारतीय जमिनीवर क्लीन स्वीप मिळणार आहे. यापर्वी टीम इंडियाने न्यूझीलंडचा असा पराभव कधीही केलेला नाही(Team India trying to give a clean sweep to New Zealand; Rohit will show Dhoni-Kohli what they didn't get?).

    कोलकाता : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची आणि तिसरी टी-२० मॅच(T20 Match: India vs New Zealand ) आज कोलकात्यात होणार आहे. जर रोहीतच्या टीमने ही कामगिरी केली, तर न्यझीलंड संघाला भारतीय जमिनीवर क्लीन स्वीप मिळणार आहे. यापर्वी टीम इंडियाने न्यूझीलंडचा असा पराभव कधीही केलेला नाही(Team India trying to give a clean sweep to New Zealand; Rohit will show Dhoni-Kohli what they didn’t get?).

    धोनी-विराटला मागे टाकणार रोहित ?

    भारतीय ग्राऊंडवर टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये ही तिसरी सीरिज होते आहे. यापूर्वी २११२ साली दोन्ही टीममध्ये पहिल्यांदा सिरिज पार पडली होती. त्यावेळी कॅप्टन्सी धोनीकडे होती. त्यावेळी दोन मॅचच्या सीरिजमध्ये न्यूझीलंडने भारताला १-० ने हरविले होते. तर २०१७ साली झालेल्या सीरिजमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला ३ मॅचमध्ये २-१ अशी मात दिली होती. भारतने ही सीरिज जिंकली असली तरी क्लीन स्विप देणे टीम इंडियाला शक्य झाले नव्हते. यावेळी मात्र ही संधी टीम इंडियाला सहज शक्य दिसते आहे.

    स्ट्रेन्थ तपासण्याची संधी

    जयपूरमध्येपाच विकेट्स आणि रांचीत सात विकेट्सने टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आज टीमची स्ट्रेंथ तपासण्याची संधी आहे. आजच्या मॅचमध्ये ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, युजवेंद्र चहल आणि आवेश खान यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. ऋतुराजला आज ओपनिंगची संधी मिळण्याचीही शक्यता आहे. तर चहल, अश्विन किंवा अक्षरच्या ऐवजी ग्राऊंडवर दिसू शकेल. सातत्याने खेळणाऱ्या ऋषभ पंतऐवजी ईशानला संधी मिळू शकते. दीपक चाहर किंवा भुवनेश्वर कुमाऐवजी आवेश खान मैदानात दिसेल.

    न्यूझीलंडसाठी प्रतिष्ठेची लढत

    न्यूझीलंडच्या दोन्ही मॅच मध्ये मिलड ऑर्डर चांगली कामगिरी करु शकलेली नाही, हेच पराभवाचे मोठे कारण होते. बॅट्समनना अजूनही चांगला सूर सापडलेला दिसत नाहीये. तर बॉलिंगही विलग होत असल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत प्रत्येक प्लेअरला चांगली कामगिरी करण्याची संधी आहे.