अफगाणींनी न्यूझीलंडला हरवले तरच होणार टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश

आता टीम इंडियाचे आणि चाहत्यांचे डोळे अफगाणिस्थानच्या टीमकडे लागले आहेत. अफगाणिस्थान विरुद्ध न्यूझीलंडच्या होणाऱ्या मॅचमध्ये अफगाणींनी विजय मिळवला, तरच टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंडचा पराभव झाला तर टीम इंडिया अंतिम चार टीममध्ये सेमीफायनलसाठी क्वालिफाय करु शकेल.

    दुबई – टी-३० वर्ल्ड कप सीरिजमध्ये आता उत्कंठा शिगेला पोहचली आहे. टीम इंडियाने शुक्रवारी स्कॉटलंडविरुद्धची मॅच एकतर्फी जिंकल्याने, चांगला रन रेट गाठण्याचे ध्येय साध्य केले असले तरी सेमी फायनलमध्ये प्रवेश होण्यासाठी आणखी एक संकट पार व्हावं लागणार आहे.

    आता टीम इंडियाचे आणि चाहत्यांचे डोळे अफगाणिस्थानच्या टीमकडे लागले आहेत. अफगाणिस्थान विरुद्ध न्यूझीलंडच्या होणाऱ्या मॅचमध्ये अफगाणींनी विजय मिळवला, तरच टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी मिळणार आहे. न्यूझीलंडचा पराभव झाला तर टीम इंडिया अंतिम चार टीममध्ये सेमीफायनलसाठी क्वालिफाय करु शकेल.

    स्कॉटलंडला एकतर्फी नमवले

    टीम इंडियाने धमाकेदार कामिगीरी करत स्कॉटलंडविरुद्धची मॅच ८ विकेट्सने जिंकली. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा खेळणाऱ्या स्कॉटलंडने १७. ओव्हरमध्ये ८५ रन्स केल्या. सर्व प्लेअर्स बाद झाले. जडेजा आणि शमीला प्रत्येकी ३ विकेट्स मिळाल्या. त्यानंतर ८६ रन्सचा पाठलाग करताना, टीम इंडियाने केवळ ६.३ ओव्हर्समध्ये २ विकेट्स गमावत मॅच सहज आपल्या खिशात टाकली. ओपनर्स रोहित शर्मा आणि के एल राहुलने ३० बॉलमध्ये ७० रन्स केल्या.

    सेमी फायनलचे आव्हान चिकवून ठेवण्यासाठी टीम इंडियाला अफगाणिस्थानपेक्षा चांगला रनरेट हवा होता. त्यामुळे स्कॉटलंडची मॅच ७.१ ओव्हरमध्ये जिंकणे गरजेचे होते. टीम इंडियाने ६.३ ओव्हरमध्येच मॅच आपल्या खिशात घातली. आता नामिबियासोबतची शेवटची मॅचही टीम इंडियाला मोठ्या फरकाने जिंकावी लागणार आहे.