चौथ्या दिवशी मोठा स्कोअर उभे करण्याचे टीम इंडियाच्या बॅट्समनसमोर आव्हान, न्यूझीलंडचे बॉलर्स बदलू शकतात गेम

दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही प्लेअरस्ना अद्याप त्यांचा सूर गवसलेला दिसत नाही. अशा स्थितीत आज या दोन्ही प्लेरस्कडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मयंक अग्रवाल आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. बॅट्समना वेगात रन्स जमा कराव्या लागणार आहेत. असे केल्यास न्यूझीलंडला दुसऱ्या डावात रोखण्यासाठी बॉलर्सना वेळ मिळेल.

    कानपूर – टीम इंडियाने शनिवारी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे विजयाच्या आशा क्रिकेट चाहत्यांना आहेत. शनिवारचा दिवस हा अक्षर पटेलचा दिवस होता. पाच विकेट्स काढत त्याने मोठी कामगिरी केली. त्यामुळे न्यूझीलंड टीम २९६ रन्समध्येच तंबूत परतली. दुसऱ्या डावाची टीम इंडियाची सुरुवात फारशी समाधानकारक झालेली नाही. शुभमन गिल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाची स्थिती एका विकेटवर १४ अशी होती. दिवसअखेर टीम इंडियाकडे ६३ रन्सची बढत मिळालेली आहे.

    आजचा चौथा दिवस त्यामुळेच महत्त्वाचा आहे. टीम इंडियाचे बॉट्समन आज काय कामगिरी करतात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल

    दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारा, अजिंक्य राहणे यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही प्लेअरस्ना अद्याप त्यांचा सूर गवसलेला दिसत नाही. अशा स्थितीत आज या दोन्ही प्लेरस्कडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. मयंक अग्रवाल आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे. बॅट्समना वेगात रन्स जमा कराव्या लागणार आहेत. असे केल्यास न्यूझीलंडला दुसऱ्या डावात रोखण्यासाठी बॉलर्सना वेळ मिळेल.

    न्यूझीलंडचे बॉलर्स चांगली कामगिरी करीत आहेत, अशा स्थितीत त्यांचे आव्हानही टीम इंडियापुढे असणार आहे.