Team India's resounding victory over Afghanistan! The Indian team remains in the race for the semi-finals

    अबुधाबी : टी-२० वर्ल्ड कपच्या सुपर १२ मॅचमध्ये टीम इंडियाची आज अफगाणिस्तानसह लढत झाली. टीम इंडियाने अफगाणिस्थानवर ६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयसह भारतीय संघ सेमी फायनलच्या रेसमध्ये कायम राहिला आहे.

    या मॅचमध्ये टॉस जिंकून अफगाणिस्थानने बॉलिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये २११ रन्सचे लक्ष्य अफगाणिस्थानसमोर ठेवले. पहिल्या विकेटसाठी ओपनर रोहित शर्मा आणि के एल राहुल यांनी शानदार खेळी केली. त्यांनी पार्टनरशीपमध्ये ८६ बॉलमध्ये १४० रन्स काढल्या.

    रोहित शर्माने ७४ रन्स तर राहुलने ६९ रन्स केल्या. ही पार्टनरशीप करीम जनातने रोहितला आईट करुन तोडली. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्याने अफगाणिस्थानला कोणतीच संधी दिली नाही. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २१ बॉल्समध्ये ६३ नाबाद रन्स कमविल्या. पंतने १३ बॉल्समध्ये २७ तर हार्दिक पांड्याने १३ बॉल्समध्ये ३५ रन्स पटकावल्या. या मॅचमध्ये ईशान किशान आणि वरुण चक्रवर्तीच्या ऐवजी सूर्यकुमार यादव आणि आर अश्विन यांना संधी देण्यात आली.

    मात्र, अफगाणिस्थानची सुरुवात खराब झाली.  पहिल्या तीन ओव्हरमध्येच त्यांनी २ विकेट्स गमावल्या. टीम इंडियाने दिलेलेल २११ रन्सचे लक्ष्य अफगाणिस्तानला झेपले नाही. अफगाणिस्तानच्या संघाने २० ओव्हरमध्ये १४४ धावा काढल्या.