द. अफ्रिका दौऱ्यातून शिखर धवनचा पत्ता कट? विजय हजारे ट्रॉफीत ऋतुराज, भरत आणि व्यंकटेशची दमदार कामगिरी, गब्बरची बॅट अद्यापही शांतच

द. अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टेस्य टीमची घोषणा करण्यात आली असली तरी वनडेच्या टीमची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. विजय हजारे ट्रॉफीनंतर ही घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिखर धवनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे(The. Shikhar Dhawan's address cut off from Africa tour? Rituraj, Venkatesh and Bharat perform well in Vijay Hazare Trophy). हजारे ट्रॉफीच्या मॅचेसमध्ये पहिल्या चार डावांत शिखरने केवळ १८, १४,१२ आणि ० अशी कामगिरी केली आहे. दुसरीकडे युना बॅट्समन चांगली कामगिरी करत असून, चांगल्या रन्स काढतायेत.

    नवी दिल्ली : द. अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या टेस्य टीमची घोषणा करण्यात आली असली तरी वनडेच्या टीमची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. विजय हजारे ट्रॉफीनंतर ही घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शिखर धवनच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे(The. Shikhar Dhawan’s address cut off from Africa tour? Rituraj, Venkatesh and Bharat perform well in Vijay Hazare Trophy). हजारे ट्रॉफीच्या मॅचेसमध्ये पहिल्या चार डावांत शिखरने केवळ १८, १४,१२ आणि ० अशी कामगिरी केली आहे. दुसरीकडे युना बॅट्समन चांगली कामगिरी करत असून, चांगल्या रन्स काढतायेत.

    ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत आत्तापर्यंत तीन सेच्युरी लगावल्या आहेत. ऋतुराजच्यासह व्यंकटेश अय्यरही फॉर्मात आहे. देल्या दोन मॅचमध्ये त्याने दोन सेंच्युरी केल्या आहेत. या दोघांच्या पाठोपाठ के एस भरतनेही आंध्र प्रदेशकडून खेळताना १०८ बॉल्समध्ये १६१ रन्स केले आहेत. न्यूझीलंडच्या टेस्ट सीरिजमध्ये भरतने चांगले विकेटकिपिंग करत सगळ्या क्रिकेट जगताचे लक्ष स्वताकडे वेधून घेतले होते. त्यामुळे या तीन क्रिकेटर्सची निवड द. अफ्रिका दौऱ्यासाठी होण्याची दाट शक्यता आहे.

    कोणाला मिळणार वनडे टीममध्ये  स्थान?

    टीममध्ये आधीच के एल राहुल आणि रोहित शर्मा हे ओपनर्स असल्यामुळे, ऋतुराज गायकवाड शिखर धवनची जागा घेण्याची शक्यता आहे. येत्या काळात गरज पडल्यास ऋतुराज ओपनिंग बॅट्समनसाठी चांगला पर्याय असू शकेल. व्यंकटेश अय्यर आणि केएस भरत हे दोघेही मिडल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करु शकतात. अय्यर चांगला मिडियम पेसरही असल्याने ऑलराऊंडरसाठी त्याचा पर्याय निवड समितीसमोर असेल. हार्दीक पांड्या टीममध्ये नसल्यानेही अय्यरसाठी चांगली संधी असेल.