The T-20 captaincy was also removed from the ODI captaincy for not listening to him; BCCI President Sourav Ganguly's explanation about Virat Kohli

बीसीसीआयने विराट कोहलीच्या ऐवजी रोहित शर्मा याची निवड टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी केली आहे. वन डे कॅप्ट्नसीचा राजीनामा देण्यासाठी विराट कोहलीला ४८ तासांचा अवधी देण्यात आला होता. त्या काळात उत्तर न आल्याने अखेरीस बीसीसीआयने त्यांना पदावरुन हटविले. देशातील सर्वाधिक सफल चौथे वन डे कॅप्टन कोहली यांना हटवल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांनंतर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आहे(The T-20 captaincy was also removed from the ODI captaincy for not listening to him; BCCI President Sourav Ganguly's explanation about Virat Kohli).

    नवी दिल्ली : बीसीसीआयने विराट कोहलीच्या ऐवजी रोहित शर्मा याची निवड टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी केली आहे. वन डे कॅप्ट्नसीचा राजीनामा देण्यासाठी विराट कोहलीला ४८ तासांचा अवधी देण्यात आला होता. त्या काळात उत्तर न आल्याने अखेरीस बीसीसीआयने त्यांना पदावरुन हटविले. देशातील सर्वाधिक सफल चौथे वन डे कॅप्टन कोहली यांना हटवल्यानंतर आलेल्या प्रतिक्रियांनंतर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही माहिती दिली आहे(The T-20 captaincy was also removed from the ODI captaincy for not listening to him; BCCI President Sourav Ganguly’s explanation about Virat Kohli).

    हा निर्णय बीसीसीआय आणि निवड समितीने मिळून घेतल्याचे सौरव गांगुली यांनी सांगितले आहे. टी-२० ची कॅप्टन्सी विराटने सोडू नये, असे बीसीसीआयने विराटला सांगितले होते, पण त्याने ते ऐकले नसल्याचेही गांगुली यांनी सांगितले.

    मर्यादित ओव्हर्सच्या मॅचेसमध्ये, म्हणजे टी-२० असो वा वन डे, त्यात वेगवेगळ कॅप्टन नकोत, अशी निवड समितीची इच्छा होती. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला, असेही गांगुली यांनी सांगितले. ता यापुढे रोहित शर्मा हा वन डे आणि टी-२०चा कॅप्टन असेल आणि टेस्ट मॅचची कॅप्टन्सी विराट कोहलीकडे असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

    गांगुली आणि जय शाह झाले ट्रोल

    रोहित शर्माला वन डे टीमचा कॅप्टन केल्यानंतर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि बोर्डाचे सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल करण्यात आले. कोहलीला कॅप्टन्सीवरुन काढल्यामुळे त्याचेचाहते चांगलेच नाराज झाले आहेत.

    जेव्हा कोहलीने टी-२० कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा सौरव गांगुलीने या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. तिन्ही फॉरमॅचमध्ये कॅप्टन्सी सांभाळणे हे अवघड काम असते, आणि हे किती अवघड आहे, एक कॅप्टनच समजू शकतो, असेही गांगुली म्हणाले होते.