कोरोनाच्या ऑमीक्रोन विषाणूच्या सावटात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडिया तब्बल 50 दिवस दक्षिण आफ्रिकेत बायो बबलमध्ये राहणार आहे(Tour of South Africa; Team India will stay in Bio Bubble for 50 days).

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाण्यासाठी टीम इंडिया रविवारी मुंबईत एकत्र आली. मुंबईत चार दिवस खेळाडूंना क्वारंटाईन राहावे लागेल. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला रवाना होतील. भारताचा पहिला कसोटी सामना 26 डिसेंबर रोजी सुरू होणार आहे.
एकीकडे दक्षिण आफ्रिकेमधून आलेल्या ओमिक्रॉन विषाणूने जगभर भीती निर्माण केली आहे. त्यातच हे क्रिकेट सामने होत आहेत. त्यामुळे चिंता आहे. विशेषतः याबद्दल अनेक अफवाही पसरल्या आहेत. मात्र, बीसीसीआयने या अफवांचे खंडन केले आहे. सोबतच या दौऱ्यात तीन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जातील, अशी माहिती दिली.