Virat Kohli breaks Indian master blaster Sachin Tendulkar's record

कॅनबेरा: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत  भारताचा कर्णधार विराट कोहली याने एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने १२ हजार धावा करत भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा रेकॉर्ड  मोडला आहे.

विराटने २४२ डावात १२ हजार धावा केल्या आहेत. तर, ३०० डावात १२ हजार पूर्ण करण्याचा सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड होता. आता हा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे.

याआधी विराटने वनडेमध्ये सर्वात वेगाने ८ हजार, ९ हजार, १० हजार आणि ११ हजार धावा करण्याचा विक्रम पूर्ण केला आहे.