विराट कोहली वादाच्या भोवऱ्यात; सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे…

विराटने या पोस्टच्या माध्यमातून जाहिरात नियमांचे उल्लंघन केले आहे. ही पेड जाहिरात असल्याचा कोणताही उल्लेख पोस्टमध्ये केला नव्हता. यासंदर्भतील डिस्क्लेमर नसल्यामुळे विराट कोहलीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागू शकते. आस्की अधिकाऱ्यांनी याचे संकेतही दिले आहेत.

    दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावरील एका पोस्टने वाद ओढावून घेतला आहे. इंग्लंड दौऱ्यावर कसोटीची तयारी करत असलेल्या विराटने एका खासगी युनिवर्सिटीचे प्रमोशन केले होते. या पोस्टमध्ये त्याने ऑलिम्पिकचाही उल्लेख केला होता. विराटची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले.कोहलीच्या या पोस्टवर जाहिरात क्षेत्राचे नियमन करणाऱ्या ‘आस्की’ने (अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया) देखील आक्षेप नोंदवल्याने तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

    प्राप्त माहितीनुसार, विराटला नोटीस बजावली जाण्याची शक्यता व्यक्त केली जता आहे. विराटने या पोस्टच्या माध्यमातून जाहिरात नियमांचे उल्लंघन केले आहे. ही पेड जाहिरात असल्याचा कोणताही उल्लेख पोस्टमध्ये केला नव्हता. यासंदर्भतील डिस्क्लेमर नसल्यामुळे विराट कोहलीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागू शकते. आस्की अधिकाऱ्यांनी याचे संकेतही दिले आहेत.

    विराट कोहलीने ऑलिम्पिकचा उल्लेख करत इन्टाग्रामवरुन जी पोस्ट शेअर केली होती त्यात लिहिलं होतं की, भारतात आणखी 10 LPU ची आवश्यकता आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या एलपीयूतील 11 विद्यार्थांना शुभेच्छा! हे एक मोठं यश आहे. विराट कोहलीने या पोस्टच्या माध्यमातून लवली प्रोफेशनल युनिवर्सिटीची जाहिरात केली होती.