विराटचा कसोटी कर्णधारपदालाही रामराम!

गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा वाद सुरू आहे. आधी टी20 त्यानंतर एकदिवसीय कर्णधारपद आणि आता कसोटी कर्णधारपदाचाही त्याने राजिनामा दिला आहे.

    विराट कोहलीनो (Virat Kohli) भारतीय टेस्ट टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने पराभव झाल्याच्या 24 तासांमध्येच विराटने राजीनामा दिला. या बाबत विराटने सोशल मिडीयावरून माहिती दिली.

    दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभवाला सामोरं जावं लागले होतं. या पराभवामुळे विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धोनीने कसोटी कर्णधारपद सोडलण्यानंतर विराट कोहलीकडे धुरा सोपवण्यात आली होती. विराट कोहलीने भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विदेशात विजय मिळवले आहे. विराट कोहली भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक विजय संपादन केले आहेत.