Viratsena slammed the poor performance on the bio-bubble; BCCI to take big step

यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सर्वांचा हा समज गैसमज ठरला. स्पर्धेत खराब कामिगरीचे खापर विराटसेनेने बायो-बबलवर फोडले. बायो-बबलमध्ये राहून खेळाडूंना थकवा येतो हे कारण देत टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगामी काळात बीसीसीआय एक मोठे पाऊल उचलणार आहे(BCCI makes BIG decision). ज्यामुळे खेळाडूंना बायो बबलचा थकवा जाणवणार नाही.

    दिल्ली : यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु सर्वांचा हा समज गैसमज ठरला. स्पर्धेत खराब कामिगरीचे खापर विराटसेनेने बायो-बबलवर फोडले. बायो-बबलमध्ये राहून खेळाडूंना थकवा येतो हे कारण देत टीम इंडियाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगामी काळात बीसीसीआय एक मोठे पाऊल उचलणार आहे(BCCI makes BIG decision). ज्यामुळे खेळाडूंना बायो बबलचा थकवा जाणवणार नाही.

    वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित

    बीसीसीआय आता संघ निवडण्यापूर्वी खेळाडूची चाचणी घेईल आणि त्यांच्या वर्कलोड मॅनेजमेंटवर लक्ष केंद्रित करेल. या प्रक्रियेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह बीसीसीआयचे सचिव जय शाहदेखील सहभागी असणार आहेत. राहुल द्रविड यांनी देखील खेळाडूंच्या थकव्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत निवडकर्ते खेळाडूंना विश्रांती देण्याबाबत निर्णय घेत असत. परंतु टी20 वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर खेळाडूंचा थकवा हे महत्त्वाचे कारण ठरले. अशा परिस्थितीत, सूत्रांच्या मते, बीसीसीआयला बायो-बबलचा खेळाडूंवर परिणाम होऊ नये असे वाटत आहे.

    न्यूझीलंडविरुद्ध वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती

    भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी20 सिरीज प्रारंभ होणार आहे. या सिरीजसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने माहिती देत म्हटले की, बीसीसीआय निर्णय घेईल की, कुठल्या खेळाडूला विश्रांती द्यायची आहे. कुठला खेळाडू किती क्रिकेट खेळला आहे यावरून त्याचा निर्णय घेतला जाईल. ज्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे आणि त्याच्या जागी आलेला खेळाडू चांगली कामगिरी करतो, तरीही त्या खेळाडूचे स्थान धोक्यात येणार नाही. त्याला त्याची जागा परत मिळेल.

    रहाणे-पुजारा यांच्यावर निर्णय

    रोहित शर्माची टी-20 संघाचा कर्णधार म्हणून अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे आणि तो लवकरच एकदिवसीय सामन्यांची जबाबदारी स्वीकारणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय कसोटी संघाच्या रचनेतही बदल होऊ शकतो. या अंतर्गत मधल्या फळीसाठी नवे चेहरे आजमावण्याचे काम होऊ शकते. न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या कसोटी मालिकेत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते असे मानले जात आहे.

    या मालिकेतील कामगिरी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची भूमिका तयार करेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी भारताने आपला ज्युनियर संघ दौऱ्यावर जाहीर केला आहे. यात दुसऱ्या फळीतील जवळपास सर्वच खेळाडूंचा समावेश आहे. यासोबत निवडकर्त्यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या भवितव्यावर वेळ घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजले जात आहे. कसोटी संघातील हे दोन्ही खेळाडू अलीकडच्या काळात फॉर्मशी झगडत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्याच्या बॅटमधून सतत धावा येत नाहीत. अशा स्थितीत आगामी मालिकेत टीम इंडियाच्या मधल्या फळीत बदल होऊ शकतो असे मानले जात आहे.