With the exit of Team India, the number of spectators watching the World Cup will decrease by 50%; Advertising profits hit thousands of crores

टी-२० वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर पडल्याने(T20 World Cup-With the exit of Team India), क्रिकेट प्रेमी तर निराश झाले आहेतच, पण याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो टीव्हींवर जाहिरातींचे स्लॉट विकणाऱ्या एजन्सींना. कारण अगदी सोपे आहे. सुपर १२ मध्ये खेळत असलेल्या देशांची एकूण लोकसंख्या आहे १९९ कोटी. त्यातील १३५ कोटी प्रेक्षकसंख्या असलेल्या भारताची टीमच नॉकआऊट राऊंडमध्ये पोहचू शकलेली नाही. म्हणजेच एकूण प्रेक्षकसंख्येत ६७ टक्के वॉटा असलेला देश आता टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे(the number of spectators watching the World Cup will decrease by 50%; Advertising profits hit thousands of crores).

  नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधून टीम इंडिया बाहेर पडल्याने(T20 World Cup-With the exit of Team India), क्रिकेट प्रेमी तर निराश झाले आहेतच, पण याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो टीव्हींवर जाहिरातींचे स्लॉट विकणाऱ्या एजन्सींना. कारण अगदी सोपे आहे. सुपर १२ मध्ये खेळत असलेल्या देशांची एकूण लोकसंख्या आहे १९९ कोटी. त्यातील १३५ कोटी प्रेक्षकसंख्या असलेल्या भारताची टीमच नॉकआऊट राऊंडमध्ये पोहचू शकलेली नाही. म्हणजेच एकूण प्रेक्षकसंख्येत ६७ टक्के वॉटा असलेला देश आता टी-२० वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे(the number of spectators watching the World Cup will decrease by 50%; Advertising profits hit thousands of crores).

  या टूर्नामेंटच्या ४ सेमीफायनल्स आणि एक फायनल अशा पाच मॅचेस अद्याप बाकी आहेत. आता या मॅचेस टिव्हीवर कंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत ५० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. प्रेक्षकसंख्या कमी होणार असल्याने, मॅचमध्ये दाखविण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या व्यवसायालाही १हजार कोटींचा फटका बसण्याची चिन्हं आहेत.

  आयसीसी सुरक्षित, २०२३ पर्यंतचे हक्क विकलेत

  टीम इंडिया बाहेर पडल्याने आयसीसीला फटका बसणार नाही, कारण आयसीसीने २०१५ ते २०२३ पर्यंतचे सर्व टुर्न्मामेंटचे प्रसारणाचे आणि डिजिटल हक्क, स्टार इंडियाला सुमारे १४३.८ कोटी रुपयांना आधीच विकले आहेत. यात २०२३चा वनडे वर्ल्ड कप, टी-२० वर्ल्ड कप २०२२ यांचा समावेश आहे.

  स्टार इंडियालाही नुकसान नाही, त्यांचे जाहिरातीचे स्लॉट विकले गेलेत

  सध्याची अधिकृत प्रसारण करणारी कंपनी स्टार इंडियाला टीम इंडिया बाहेरल पडल्याने फरक पडणार नाहीये. या टुर्नामेंटच्या मॅचमधील जाहिरातींचे स्लॉट सुमारे दीड डझन जाहिराती विकू शकणाऱ्या कंपन्यांना स्टार इंडियाने यापूर्वीच विकले आहेत. या कंपन्या प्रकरण करणाऱ्यांकडून जाहिराती विकत घेऊन, त्या अशा कंपन्य़ांना विकतात, ज्यांना मॅचदरम्यान आपल्या उत्पादनाची जाहिरात करायची असते. बऱ्याचदा व्यवहार करणाऱअया कपन्यांना नेमकं ग्राऊंडवर काय घडेल, याची शाश्वती नसते, त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सर्व जाहिरातींचे स्ल़ॉट साधारण टुर्नामेंट होण्याच्या आधीच्या काळात विकल्या जातात.

  बायिंग करणाऱ्या एजन्सीकडे १० ते १५ टक्के स्लॉट्स शिल्लक, त्याचा नफा सोडावा लागणार

  प्रासरण कंपनीकडून जाहिरातींचे स्लॉट खरेदी करुन त्या संबंधित कंपन्यांना विकणाऱ्या बायिंग एजन्सींनी १० ते १५ टक्के स्लॉट रिकामे ठेवले होते. टीम इंडिया सेमी फायनलमध्ये आली असती, तर हे स्लॉट आयत्यावेळी मोठ्या किमतीला विकून त्यांना नफा कमवता आला सता. आता हा नफा त्यांना मिळणार नाही. त्यामुळे सुमारे १००० कोटींचा फटका या कंपन्यांना बसणार आहे. याचा अर्थ असा की अशा स्थितीत एकेका बायिंग कंपनीला ३८ ते ५५ कोटी रुपयांचा नफा होतो.

  आयसीसी इव्हेन्ट्सला आयपीएलचे आव्हान

  आयसीसीला प्रसारण हक्क विकताना यावेळी आयपीएलच्या आव्हानाचा मुकाबला करावा लागला आहे. एककीजडे आयसीसी २०२४ ते २७ चे प्रसारण हक्काच्या प्रयत्नात हे, तर दुसरीकडे बीसीसीआय २०२३ ते २७ चे आयपीएलचे प्रसारण हक्क विकण्य़ाच्या प्रयत्नात आहे. कोणतीही मॅच बाहेर पडली तरी आयपीएलची प्रेक्षकसंख्या कमी होण्याची शक्यता नसल्याने, आयपीएलचे प्रसारम हक्क विकणे आयसीसीपेक्षा सोपे आहे. मात्र आयसीसीच्या मॅचेसमध्ये टीम डिया ढेपाळली तर त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागण्याची शक्यता आहे. पुढच्या सिझनमध्ये आयपेलच्या मॅचेसही वाढणार असून त्या ६० वरुन ७४ वर पोहचणार आहेत. त्यामुळे यंदा आयपीएलसाठी बीसीसीआयला ३५ हजार कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.