महिला आयपीएल स्पर्धा लवकरच; बीसीसीआय अध्यक्षांचा खुलासा

महिला आयपीएल स्पर्धा लवकरच सुरू होईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने याचा ड्राफ्ट तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या स्पर्धेबाबतची आमची योजना काय आहे, हे स्पष्ट होईल, असे गांगुली यांनी सांगितले. यामुळे महिला आयपीएल स्पर्धेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहे(Women's IPL tournament soon; BCCI president's revelation).

    मुंबई : पुरुष आयपीएलच्या धर्तीवर महिला आयपीएल स्पर्धा सुरू करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये महिलांच्या या प्रकारच्या स्पर्धा होतात, मग भारतात का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

    महिला आयपीएल स्पर्धा लवकरच सुरू होईल. भारतीय क्रिकेट बोर्डाने याचा ड्राफ्ट तयार करण्यास सुरुवात केली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या स्पर्धेबाबतची आमची योजना काय आहे, हे स्पष्ट होईल, असे गांगुली यांनी सांगितले. यामुळे महिला आयपीएल स्पर्धेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहे(Women’s IPL tournament soon; BCCI president’s revelation).

    नुकत्याच झालेल्या बिग बॅश लीग स्पर्धेत भारतीय महिला टी 20 टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौरने ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’ पुरस्कार पटकावला आहे. गांगुलींनी याबाबत बोलताना सांगितले की, मी हरमनप्रीतच्या बिग बॅश लीग स्पर्धेत खेळावर जाम खूश आहे. हरमन, स्मृती, शफाली, मिताली आणि झुलन गोस्वामी या सर्व टीम इंडियाच्या शक्ती आहेत. महिला क्रिकेटपटूंना घरगुती क्रिकेटमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबत बीसीसीआय सकारात्मक आहे, असे गांगुली यांनी सांगितले.