क्रिकेटपटू शिखर धवन पत्नीपासून घेणार घटस्फोट! पत्नी मानसिक त्रास देत असल्यानं घेतला काडीमोड, 11 वर्षाचा संसार मोडला

दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने क्रिकेटपटू शिखर धवनची घटस्फोटाची याचिका स्वीकारली असून त्याला घटस्फोट घेण्यास परवानगी दिली आहे. घटस्फोटाची ही याचिका खुद्द क्रिकेटर धवनने दाखल केली होती.

    भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनला (Shikhar Dhawan) त्याच्या पत्नीपासून घटस्फोट ( Cricketer Shikhar Dhawan Divorced With Wife  मंजूर झाला आहे. दिल्लीच्या कौटुंबिक न्यायालयाने शिखर धवनला पत्नीने केलेल्या क्रूरतेच्या कारणावरून घटस्फोटासाठी पात्र मानले आहे. घटस्फोटाची ही याचिका क्रिकेटर शिखर धवनने दाखल केली होती, ज्यामध्ये पत्नीने केलेल्या क्रूरतेचा उल्लेख होता.

    11 वर्षाचा संसार मोडला

    दिल्ली कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हरीश कुमार यांनी 11 वर्ष जुन्या लग्नाच्या प्रकरणात हा निर्णय दिला आहे. दोन्ही पक्षांमध्ये कोणताही वाद नसून दोघेही परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यास तयार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. ऑगस्ट 2020 पासून दोघेही वेगळे राहत असल्याने त्यांचे लग्न फार पूर्वीच संपले असल्याचे न्यायालयाने मान्य केले. शिखर धवनची पत्नीही त्यांना कायदेशीर घटस्फोट देण्यासाठी कोर्टात तयार होती. शिखर धवनची पत्नी मूळची ऑस्ट्रेलियाची असून त्यांचे लग्न प्रेमसंबंधानंतर झाले होते. शिखरच्या पत्नीनेही ऑस्ट्रेलियातील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

    मुलाचा ताबा कुणाकडे?

    शिखर धवन आणि त्याच्या पत्नीला एक मूलही आहे. पती-पत्नीमधील तणाव आणि भांडणामुळे मुलावर शारीरिक आणि मानसिक परिणाम होत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे त्याच्या जन्माच्या कल्याणकारी हक्कांच्या विरोधात आहे. शिखरने आपल्या याचिकेत पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोपही केला होता, न्यायालयाने हे मुलासाठी हानिकारक असल्याचे मानले आणि घटस्फोट मंजूर करण्याचे हे एक प्रमुख कारण ठरले. सध्या ऑस्ट्रेलियन कोर्टात मुलाच्या कस्टडीचे प्रकरणही सुरू आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.