
क्रोएशियाच्या संघानं सामन्याच्या पूर्वार्धात दोन गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. क्रोएशियाच्या मिस्लाव ओरसिकने 42 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला मोरोक्कोवर 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आज फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स अशी लढत आज होणार आहे.
मुंबई : कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामना आज पारपडणार आहे. त्याआधी म्हणजेच शनिवारी विश्वचषकाच्या क्रमवारीत तिसरे स्थान पटकावण्याची क्रोएशिया आणि मोरोक्को यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात क्रोएशिया संघाने मोरोक्कोवर २-१ ने विजय मिळवून विश्वचषकातील क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली.
क्रोएशियाचे (Croatia) विश्वविजेतेपदाचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी तिसऱ्या क्रोएशियाने काल चा सामना जिंकला आणि फिफा विश्वचषक २०२२ मधील कांस्यपदकावर नाव कोरले. क्रोएशियाचा कर्णधार ल्युका मॉड्रिचचा (Luka Modric) हा विश्वचषकातील अखेरचा सामना होता. कारण त्याने निवृत्ती घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. गेल्या विश्वचषकात क्रोएशिया उपविजेता ठरला होता. यावेळी त्याला उपांत्य फेरीत लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिना संघाकडून ३-० पराभव पत्करावा लागला.
मोरोक्कचा (Morocco) संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ होता. उपांत्य फेरीत मोरोक्कोला फ्रान्सकडून पराभव पत्करावा लागला. आता तिसऱ्या स्थानसाठी झालेल्या सामन्यात क्रोएशियाकडून मोरोक्कोचा पराभव झाला आहे. या विश्वचषकात मोरोक्कोचा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. क्रोएशियाच्या संघानं सामन्याच्या पूर्वार्धात दोन गोल करत 2-1 अशी आघाडी घेतली. क्रोएशियाच्या मिस्लाव ओरसिकने 42 व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला मोरोक्कोवर 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आज फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स अशी लढत आज होणार आहे. हा सामना जिंकून विश्वचषकावर कोण नाव कोरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.