मिनी ऑक्शनमध्ये CSK संघ लावणार इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूवर सर्वाधिक बोली

    मुंबई : आयपीएल २०२३ साठी आज कोची येथे मिनी ऑक्शन रंगणार आहे. या ऑक्शनमध्ये आयपीएलचे १० संघ आपल्या संघात शिल्लक असलेल्या जागांसाठी उत्तम खेळाडूंवर बोली लावून त्यांना आपल्या संघात घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुपारी २:३० वाजता या ऑक्शनला सुरुवात होणार असून यात ४०५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

    आपीएलमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेला चेन्नईचा संघ (CSK) मिनी ऑक्शनमध्ये माजी अनुभवी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) रिप्लेसमेन्टच्या शोधात असेल. अशावेळी संघाची नजर इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर सॅम करनवर (Sam Curran) असेल, जो आधीही संघाचा भाग होता. सॅम करनचा संघात समावेश करण्यासाठी सीएसके प्रयत्न करणार अशा चर्चा आहेत. सॅम करननं 2022च्या टी-20 विश्वचषकातील त्याच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर प्लेअर ऑफ द टूर्नामेन्टचा खिताब जिंकला. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्ज ऑक्शनमध्ये सॅम करनवर मोठी बोली लावून त्याचा संघात समावेश करण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही करनची खेळण्याची शैली आवडते. सॅम करननं पुन्हा चेन्नई सुपर किंग्जच्या संघात सामील व्हावे, अशी धोनीची इच्छा आहे.

    आयपीएल 2023 च्या ऑक्शनमध्ये सॅम करनची मूळ किंमत ही २ कोटी इतकी आहे. सॅम करन याआधी चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळला आहे. सॅम डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. सॅमची विश्वचषकातील कामगिरी पाहता आता चेन्नईसह अनेक फ्रँचायझी सॅमला आपल्या संघात सामील करण्यासाठी मोठी बोली लावण्याची शक्यता आहे.