CSK च्या अडचणीत वाढ, दीपक चहरच्या दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर

कालच्या सामन्यांमध्ये संघात मुख्य गोलंदाजांची कमतरता होती. आता संघासाठी पुढील वाटचाल सोपी वाटत नाही.

    दीपक चहर : काल चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंगच्या संघाला आयपीएल 2024 च्या हंगामातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्याआधीच चेन्नई सुपर किंग्सचे दोन मुख्य गोलंदाज मथिशा पाथिराना आणि तुषार देशपांडे यांच्या रूपाने पराभवाचा धक्का बसला होता. परंतु आता कालच्या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला (Deepak Chahar) दुखापत झाली आहे. त्यामुळे कालच्या सामन्यांमध्ये संघात मुख्य गोलंदाजांची कमतरता होती. आता संघासाठी पुढील वाटचाल सोपी वाटत नाही.

    अशा परिस्थितीत दीपक चहरची दुखापत चेन्नईसाठी मोठी समस्या बनू शकते. चहरच्या दुखापतीबद्दल माहिती देताना मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी सांगितले की, तो बरा दिसत नाही. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “चाहर चांगला दिसत नाहीये. सुरुवातीची भावना चांगली नाही. त्यामुळे आम्ही आणखी सकारात्मक अहवालाची वाट पाहत आहोत. फिजिओ आणि डॉक्टर बघतील.”

    तो पुढे म्हणाला, “श्रीलंकेचे खेळाडू व्हिसासाठी गेले आहेत. आम्हाला आशा आहे की त्यांची प्रक्रिया सोपी होईल आणि आम्ही त्यांना धर्मशाळेत होणाऱ्या सामन्यासाठी परत आणू शकू. रिचर्ड ग्लीसन चांगला होता आणि तो सकारात्मक होता. तुषार देशपांडे आम्ही आज बदल करावे लागले जे असामान्य आहेत, परंतु आमच्याकडे संसाधने आहेत आणि आम्हाला त्या गेम प्लॅनमध्ये आरामशीर होण्यासाठी वेळ मिळाला नाही.