मूसेवाला स्टाईलमध्ये विकासने साजरा केला आनंद, सिद्धूच्या आठवणीत होता २ दिवस उपाशी

सिद्धूच्या वेदनादायक हत्येनंतर विकास ढसाढसा रडला होता. म्हणूनच त्याने या दिवंगत गायकाला त्याच्या खास शैलीत आदरांजली वाहिली. विकासने ९६ किलो गटात ३४६ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

    नवी दिल्ली – कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय वेटलिफ्टर्सचे वर्चस्व कायम आहे. वेटलिफ्टिंगमध्ये, विकास ठाकूरने पुरुषांच्या ९६ किलो गटात रौप्य पदक जिंकले. हा विजय जितका प्रेक्षणीय होता तितकाच हा सोहळा संस्मरणीयही होता. वास्तविक, या शानदार कामगिरीनंतर विकासने सिद्धू मुसेवालाच्या शैलीत सेलिब्रेशन केले.

    सिद्धूच्या वेदनादायक हत्येनंतर विकास ढसाढसा रडला होता. म्हणूनच त्याने या दिवंगत गायकाला त्याच्या खास शैलीत आदरांजली वाहिली. विकासने ९६ किलो गटात ३४६ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

    यापूर्वी त्याने ग्लासगो गेम्स २०१४ मध्ये ८६ किलोमध्ये रौप्य आणि २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट गेम्समध्ये ९४ किलोमध्ये कांस्यपदक जिंकले होते.पंजाबी गायक मूसेवाला याच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी तपास सुरू असून पंजाब आणि दिल्ली पोलिसांनी अनेक आरोपींना अटक केली आहे. याशिवाय आपल्या गाण्यांसाठी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या मूसेवाला यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना हादरवून सोडले. २८ वर्षीय भारतीय वेटलिफ्टर विकास हा देखील अशा तरुणांपैकी एक होता ज्याला मुसेवाला याच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला होता.