De Kock's mistake cost South Africa semi-final? Seeing that, Markaram came to Radkundi; Watch the VIDEO
De Kock's mistake cost South Africa semi-final? Seeing that, Markaram came to Radkundi; Watch the VIDEO

South Africa Semi Final : दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव करीत ऑस्ट्रेलियाने आठव्यांदा विश्वचषक फायनलमध्ये जागा मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स ठरले आहेत.

  कोलकाता : क्रिकेट सामन्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार गुरुवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबत पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना खेळवला जात होता.

  ऑस्ट्रेलियाने सामना ३ विकेट्सने जिंकला

  या सामन्यात दक्षिण आफ्रिका अपयशी ठरली असून ऑस्ट्रेलियाने हा सामना ३ विकेट्सने जिंकला. पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. त्यानंतर अखेरच्या क्षणी कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क यांच्यातील समंजस खेळीने सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकता आला असता, पण क्विंटन डी कॉकच्या एका चुकीचा त्यांना मोठा फटका बसला.

  आपल्या ७ विकेट गमावल्या

  ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या ७ विकेट गमावल्या होत्या. विजयासाठी प्रत्येक धावेसाठी धडपड सुरू होती, त्याच दरम्यान ४५ व्या षटकात ८ धावांवर खेळत असलेल्या पॅट कमिन्सला दुसरा चेंडू टाकला, तेव्हा त्याच्या बॅटची कड लागली आणि चेंडू मागे उभा असलेल्या यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकच्या दिशेने गेला. डी कॉकला मात्र हा झेल पकडता आला नाही.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by ICC (@icc)

  ऑस्ट्रेलियावरही दडपण

  तो झेल तसा अवघडच होता, पण अशा क्षणी हा झेल पकडला असता तर दक्षिण आफ्रिकेला मोठी विकेट मिळाली असती, तर ८ विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियावरही दडपण निर्माण झाले असते. मात्र, तसे होऊ शकले नाही आणि कमिन्स बाद होण्यापासून बचावला. हा झेल सोडल्यानंतर मार्करम खूपच निराश दिसत होता, अक्षरशः मार्करम रडत असल्याचेही जाणवत होते, डी कॉककडून तो झेल सुटताच मार्करमने खाली बसत तोंड लपवले. त्याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अवघ्या काही तासांत डी कॉकचा कॅच ड्रॉपचा व्हिडिओ ६५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला.

  दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण चर्चेत
  या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण चर्चेत होते. बावुमा आणि डी कॉकला झेल पकडता आले नाही. याशिवाय दक्षिण आफ्रिकेने अनेक संधी गमावल्या. फायनलच्या इतक्या जवळ जाण्यात क्षेत्ररक्षणाचा मोठा वाटा होता असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या सामन्यासह क्विंटन डी कॉकची वनडे कारकीर्दही संपुष्टात आली. डी कॉकने विश्वचषकापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.