‘दिल्ली अब दूर नही’, आज मुंबई-दिल्लीत कांटे की टक्कर; दोन्ही संघाना पहिल्या विजयाची प्रतिक्षा…

सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघाना अजून विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळं दोन्ही संघाना विजयाची प्रतिक्षा आहे.

    नवी दिल्ली – इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16 व्या मोसमात आज (सोमवारी) आयपीएलमध्ये मुंबई (Mumbai) आणि दिल्ली (Delhi) यांच्यात सामना रंगणार आहे. या दाेन्ही संघांमध्ये आज मंगळवारी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सामना हाेणार आहे. सलगच्या पराभवाची मालिका खंडित करून आयपीएलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ सज्ज झाले आहेत. दोन्ही संघाना अजून विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळं दोन्ही संघाना विजयाची प्रतिक्षा आहे.

    दोन्ही संघाना विजयाची प्रतिक्षा…

    राेहितच्या मुंबई इंडियन्स संघाला आतापर्यंत सलग दाेन सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. यामुळे आपला सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी मुंबई संघाने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे दिल्ली संघाची पराभवाची हॅट‌्ट्रिक झाली आहे. सुरुवातीचे तिन्ही सामने दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत, वॉर्नर, पृथ्वी शॉ यांना अजून सूर गवसला नाही. तर मुंबईचा विचार केल्यास रोहित शर्मा, सुर्याकुमार यादव, इशान किशन यांना देखील अजून साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आज दिल्ली जिंकणार की मुंबई विजयाचे खाते उघडणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

    दोन्ही संघात बदल होणार?

    दरम्यान, दोन्ही संघात आज काही बदल होण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली संघातील पृथ्वी शॉला अजून सूर गवसला नाही. मुंबईत सूर्यकुमार, किशन आदी खेळाडूंच्या जागी नवीन कोणाला संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. कारण दोन्ही संघ आज जिंकण्याच्याच इराद्याने मैदानात उतरतील. त्यामुळं आज मुंबई दिल्ली काबीज करणार का, की दिल्ली मुंबईवर विजय मिळवणार याची प्रतिक्षा क्रिकेटप्रेमीना लागली आहे.