दिल्ली आणि बंगळुरू आमनेसामने! आज कोणत्या संघाचा होणार खेळ खल्लास?

तिसऱ्या सामन्यातही निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे रिषभ पंतवर आर्थिक दंडाची आणि एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

    दिल्ली विरुद्ध बंगळुरू : आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal challengers begaluru) या दोन संघांमध्ये करो या मरो अशी स्थिती आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मागील सामन्यांमध्ये पंजाब किंग्सला पराभूत करून त्यांचा गुणतालिकेमधील पत्ता कट केला. आज दिल्ली कॅपिटल्सच्या संघासमोर मोठं आव्हान असणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवर (Rishabh Pant) एक सामन्याची बंदी लावण्यात आली आहे त्यामुळे आजचा सामना रिषभ पंत खेळू शकणार नाही. तिसऱ्या सामन्यातही निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्यामुळे रिषभ पंतवर आर्थिक दंडाची आणि एका सामन्याच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

    कस आहे गुणतालिकेतचं गणित?
    गुणतालिकेमध्ये या दोन संघांचा विचार केला तर, कालच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्लेऑफसाठी पात्र झाला आहे. त्यामुळे प्लेऑफच्या जागा आता फक्त तीन शिल्लक आहेत आणि या शर्यतीत अजून 7 संघ कायम आहेत. त्यामुळे प्लेऑफमध्ये कोणते संघ जाणार हे पाहणे मनोरंजक ठरेल. गुणतालिकेमध्ये दिल्ली कॅपिटल्स सध्या 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. बंगळुरूचे आतापर्यत 10 गुण आहेत. त्यामुळे जो संघ आज विजयी होईल तो संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होईल.

    दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी
    रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात IPL मध्ये जवळच्या लढतींचा इतिहास आहे. त्यांच्या 30 सामन्यांमध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ 18 सामने जिंकले आहेत तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ 11 सामने जिंकले आहेत, एक सामना निकालाशिवाय संपला. शेवटच्या 5 चकमकींमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने वर्चस्व राखले आहे, त्यापैकी 4 जिंकले आहेत. बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियम हे DC विरुद्ध 11 सामन्यांपैकी 6 विजयांसह RCB साठी आनंदाचे मैदान आहे, जरी DC ने चिन्नास्वामीवर 4 वेळा विजय मिळवून त्यांची लढाऊ भावना दाखवली आहे. आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत दोन्ही संघ महत्त्वाच्या गुणांसाठी लढत असताना हा आगामी सामना महत्वाचा ठरेल.